पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरास 'अ' वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा;शासन निर्णय जारी

    19-May-2026   
Total Views |
Dagadusheth Halwai Ganpati
 
मुंबई : (Dagadusheth Halwai Ganpati) पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा केली होती. त्यानंतर मंगळवारी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.
 
सन १८९३ साली स्थापन झालेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिरात धार्मिक भक्ती, सामाजिक एकोपा, सांस्कृतिक वारसा आणि पर्यटन विकास यांचा संगम दिसतो. त्यामुळेच हे मंदिर राज्यातील सर्वात प्रतिष्ठित आणि लोकप्रिय धार्मिक स्थळांपैकी एक मानले जाते.
 
हेही वाचा :  संघ शिक्षावर्गातून ‘मी’ पासून ‘आम्ही’कडे जाण्याची साधना : प्रमोद बापट
 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर या स्थळाचे पर्यटन विषयक महत्व लक्षात घेता दि. १९ मे २०२३ रोजीच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, पुणे या स्थळाला 'क' वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आला होता. त्यानंतर आता 'अ' वर्ग पर्यटन स्थळ दर्जासाठी आवश्यक असलेल्या निकषांची पूर्तता होत असल्याने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, पुणे या स्थळास 'अ' वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे.(Dagadusheth Halwai Ganpati)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....