मुंबई : (Maharashtra Legislative Council) प्रदीर्घ काळापासून रिक्त असलेल्या राज्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या १६ जागांसाठी अखेर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या १८ जून २०२६ रोजी या जागांसाठी मतदान होणार असून २२ जून रोजी निकाल लागणार आहे. यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या आधी विधानपरिषदेच्या सदस्यसंख्येत भर पडणार आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका न झाल्याने जवळपास गेल्या ४ वर्षांपासून या मतदारसंघांतील जागा रिक्त आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघात निवडणूक घेण्यासाठी किमान ७५ टक्के स्थानिक संस्था कार्यरत असणे आणि ७५ टक्के मतदार पदावर असणे अनिवार्य असते. मात्र, या निकषांची पूर्तता न झाल्यामुळे २०२२, २०२४ आणि २०२५ मध्ये रिक्त झालेल्या एकूण १६ जागांवर जागांवर निवडणूक घेता आली नव्हती. आता या निकषांची पूर्तता झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
एका जागेवर होणार पोटनिवडणूक
यासोबतच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आमदार राहिलेल्या विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठीची पोटनिवडणूकही जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण १७ जागांवर ही निवडणूक होणार आहे.(Maharashtra Legislative Council)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....