भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा बार्शी ते सोलापूर एस.टी. प्रवास

    18-May-2026
Total Views |
Krishnaraj Mahadik
 
मुंबई : (Krishnaraj Mahadik) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ऊर्जा बचत, पर्यावरण संरक्षण व सार्वजनिक वाहतुकीच्या वापराच्या आवाहनाला प्रतिसाद देत, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी आपल्या “युवा शक्ती जागर महाराष्ट्र दौऱ्या” दरम्यान सोमवार दि.१८ रोजी बार्शी ते सोलापूर हा प्रवास सर्व कार्यकर्त्यांसह राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी. बसने केला.
 
कृष्णराज महाडिक यांनी यापूर्वीही महाराष्ट्र दौऱ्यासाठी इलेक्ट्रिक वाहनाचा वापर केला होता.यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना कृष्णराज महाडिक यांनी सांगितले की,"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आवाहन हे केवळ शासनाचे धोरण नसून, प्रत्येक भारतीयाने आपल्या जीवनशैलीत स्वीकारण्याची जबाबदारी आहे.
 
युवा मोर्चाचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन ऊर्जा बचत, पर्यावरण संवर्धन आणि सार्वजनिक वाहतुकीच्या वापराबाबत जनजागृती करतील."(Krishnaraj Mahadik)
 
हेही वाचा :  संत रवीदास यांच्या कार्याच्या संशोधनाला राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळावे — आशिष शेलार
 
“युवा शक्ती जागर महाराष्ट्र दौरा” अंतर्गत राज्यभर युवकांशी संवाद, संघटन मजबुतीकरण आणि समाजहिताचे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत."असेही कृष्णराज महाडिक यांनी सांगितले.(Krishnaraj Mahadik)