मुंबई : (Kirit Somaiya) "सोसायटी, चाळी आणि सार्वजनिक ठिकाणी ,मुंबईतील खुल्या जागांमध्ये होणाऱ्या पशूकत्तलींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना पत्र पाठवून मुंबई महानगरपालिकेकडे केली आहे.
बकरी ईदच्या काळात काही भागांमध्ये उघड्यावर आणि नियमबाह्य पद्धतीने बकऱ्यांची कत्तल केली जाते, असा आरोप सोमय्या यांनी पत्रातून केला आहे. महानगरपालिका आणि न्यायालयाने यापूर्वी अशा प्रकारांवर निर्बंध घातले असतानाही काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.(Kirit Somaiya)
मुंबईतील निवासी वसाहती, सोसायट्या किंवा लोकवस्तीच्या परिसरात पशूबलिदान आणि कत्तल करण्यास कायद्याने परवानगी नसल्याचे सांगत संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना कठोर सूचना देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच महानगरपालिकेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.(Kirit Somaiya)