मुंबई : (Atal Setu Fishermen Issue) शिवडी न्हावा-शेवा अटल सागरी सेतू प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मच्छीमारांच्या समस्या शासन गंभीरपणे घेत आहे. मच्छीमारांचे हित अबाधित ठेवून त्यांच्या सर्व प्रश्नांवर न्याय्य तोडगा काढण्यासाठी शासन कटिबद्ध असून विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी यासंदर्भात चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली.
न्हावा-शेवा-शिवडी सागरी सेतू प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मच्छीमारांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, दि.१८ मे रोजी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती .यावेळी मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, स्थानिक मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.तसेच मुंबई महानगरपालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.(Atal Setu Fishermen Issue)
या बैठकीत न्हावा-शेवा-शिवडी सागरी सेतू प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या मच्छीमारांच्या अडचणी, नुकसानभरपाई, पुनर्वसन, मासेमारी व्यवसायावर झालेला परिणाम तसेच भविष्यातील उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.बैठकीनंतर संबंधित विभागांकडून अहवाल सादर करण्यात येणार असून त्यानुसार पुढील कार्यवाही निश्चित केली जाणार आहे.(Atal Setu Fishermen Issue)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.