भोजशाळा सरस्वतीचं मंदिर, मशीद नव्हे, मध्य प्रदेश हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय, अयोध्या खटल्याच्या आधारावर निर्णय
15-May-2026
Total Views |
इंदूर : (Bhojshala) मध्यप्रदेशातील धारमधील भोजशाळा हे सरस्वतीचं मंदिर असल्याचा निकाल मध्य प्रदेश हायकोर्टानं दिलाय. ही जागा मंदिर नसून कमाल मौला मशीद असल्याचा मुस्लीम पक्षकारांचा दावाही हायकोर्टानं फेटाळलाय. पौराणिक, ऐतिहासिक तथ्य, भारतीय पुरातत्व विभागाचा सर्वेक्षण अहवाल आणि अयोघध्येतील राम मंदिराच्या खटल्याचा निकाल आधारभूत मानत हा निकाल देण्यात येत असल्याचं मध्य प्रदेश हायकोर्टानं स्पष्ट केलंय़. या निर्णयानंतर भोजशाळा मंदिराच्या व्यवस्थापनाबाबतचा निर्णय केंद्र सरकार आणि भारतीय पुरातत्व विभागानं करावा, असंही हायकोर्टानं स्पष्ट केलंय. १९५८ कायद्यानुसार या संपूर्म जागेचं व्यवस्थापन पुरातत्व विभागाकडेच असेल, असंही सांगण्यात आलंय. १९९५ पासून सुरु असलेल्या लढ्यात अखेर हिंदू समाजाला यश मिळालं.
२००३ साली पुरातत्व विभागानं भोजशाळेत पूजेचा अधिकार नाकारला होता, हा आदेश हायकोर्टानं रद्दबातल ठरवलाय. यासोबतच या ठिकाणी मुस्लिमांना नमाज पढण्याचा अधइकारही संपुष्टात आला आहे. मशिदीसाठी वेगळ्या जागेची मागणी करा, असं हायकोर्टाच्या वतीनं मुस्लीम पक्षकारांना सांगण्यात आलंय.
युक्तिवाद नेमका काय़ झाला?
हिंदू पक्ष- भोजशाळा (Bhojshala) भारतीय पुरातत्व विभागाच्या संरक्षित स्मारकांपैकी एक असल्यानं या ठिकाणी प्लेसेस ऑफ वर्शिप एक्ट लागू होत नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला. देशातील प्राचीन स्मारकं आणि पुरातत्व स्थळांच्या १९५१ सालच्या यादीत भोजशाळेचं नाव असल्याचं दाखवण्यात आलं. भोजशाळेत सरस्वती देवीच्या पूजेसाठी हे मंदिर हिंदू समाजाकडे सोपवण्याची मागणी करण्यात आली.
VIDEO | Dhar: Madhya Pradesh High Court declares disputed area of Bhojshala Complex a temple.
Zulfiqar Pathan, President of the Kamal Maula Mosque Namaz Intezamia Committee, said, “I would say that the order has not yet been uploaded. The order will first be reviewed, and we… pic.twitter.com/7Jy2A7h0l9
मुस्लीम पक्ष- भोजशाळा हे मंदिर आहे की मशीद आहे की जैनशाळा आहे हे स्पष्ट नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला. भारतीय पुरातत्व विभागानं केलेल्या सर्वेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. यात करण्यात आलेली व्हिडीओग्राफी अस्पष्ट असल्याचा दावा करण्यात आला. अयोध्येप्रमाणे भोजशाळेत कोणतीही मूर्ती विराजमान नसल्याचा दावा करण्यात आला
जैन पक्ष- सरस्वतीची मूर्ती म्हणून जी मूर्ती सांगण्यात येते आहे ती मूर्ती जैन समुदायाच्या अंबिका मातेची असल्याचा दावा करण्यात आला. सीहोरमध्येही अशीच मूर्ती असल्याचा दावा करत जैन तीर्थ म्हणून घोषित करण्याची मागणी करण्यात आली. (Bhojshala)
निर्णयावेळी कोर्टाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त
VIDEO | Indore: Madhya Pradesh High Court declares disputed area of Bhojshala Complex a temple.
Manoj Kumar Singh, DIG, Indore (Rural), said, “We have deployed security at all places. I want to appeal to the people of Dhar that this is the decision of the Hon’ble High Court, and… pic.twitter.com/XJGdT2obFp
हा निर्णय परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा होता. त्यामुळं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी १२०० पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. राखीव पोलीस दल आणि शीघ्र कृती दलालाही तयार ठेवण्यात आलं होतं. (Bhojshala)
१९९५ पासून संघर्ष
१९९५- भोजशाळेत दोन्ही पक्षकारांत वाद झाला, त्यानंतर प्रशासनानं मंगळवारी पूजा आणि शुक्रवारी नमाज पठणाची परवानगी दिली
१९९७- तत्कालीन मुख्यमंत्री द्ग्विजय सिंह यांनी भोजशाळेत सामान्य नागरिकांच्या प्रवेशाला बंदी घातली. मंगळवारची पूजाही बंद करण्यात आली.
१९९७- हिंदूंना वसंत पंचमी आणि मुस्लिमांना शुक्रवारी दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत नमाजपठणाला मंजुरी देण्यात आली.
१९९८- केंद्रीय पुरातत्व विभागानं पुढील आदेशापर्यंत सामान्य नागरिकांना प्रेवशास बंदी घातली.
२००२- रंजना अग्निहोत्री आणि हिंदू फ्रंट ऑर जस्टिट या संस्थेकडून हायकोर्टात पूर्ण अधिकारासाठी याचिका
२००३- मंगळवारी पूजेला मंजुरी देण्यात आली, पर्यटकांसाठी भोजशाळा खुली करण्यात आली. १८ फेब्रुवारीला तणावानंतर हिंसाचार
२०१३- वसंत पंचमी आणि शुक्रवार एकाच दिवशी आल्यानं पुन्हा तणावाची स्थिती, हिंदूंच्या आक्रमक भूमिकेनंतर पोलिसांचा हवेत गोळाबार, लाठीमार
२०१६ - वसंत पंचमी आणि शुक्रवार एकत्र आल्यानं तणाव, त्यानंतर सातत्यानं अनेकदा अघोषित संचारबंदी (Bhojshala)