'त्या' कुटुंबाचा मृत्यू कलिंगडामुळे नव्हे तर विषप्राशनानं? कुटूंबानं असं का केलं? वाचा Inside Story

    14-May-2026
Total Views |
Dokadia Family Case
 
मुंबई : (Dokadia Family Case) पायधुनी परिसरात डोकाडीया कुटुंबातील चौघांच्या मृत्यूनं मुंबईत खळबळ उडाली होती. जेवणानंतर कलिंगड खाल्ल्यानं हा मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. त्यानंतर कलिंगड उद्योगावर याचा परिणाम दिसू लागला होता. आता या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात ही सामूहिक आत्महत्या असल्याचा शंय पोलिसांनी व्यक्त केलाय. घरातील आर्थिक तणावाच्या स्थितीमुळे अब्दुल्ला डोकाडिया यांनी हा निर्णय घेतला असल्याची शक्यता आता वर्तवण्यात येतेय. या चौघांनी जेवणानंतर खालेल्या कलिंगडावर झिंक फॉस्फाईड सापडलंय. या झिंक फॉस्फाईडचा वापर उंदराना मारण्यासाठी करण्यात येतो.
 
कुटुंबप्रमुखाच्या खात्यात फक्त २० हजार रुपये
 
आत्महत्या केलेल्या डोकाडिया कुटुंबातील प्रमुख व्यक्ती असलेले अब्दुल डोकाडिया यांच्या बँक खात्यात केवळ २० ते २२ हडजार रुपये होते, असं तपासात निष्पन्न झालंय. या व्यतिरिक्त कोणतीही बचत या कुटुंबाकडे नव्हती. या बँक खात्यातून दर महिन्याला केवळ १७ ते १८ हजारांचे व्यवहार होत असल्याचंही तपासात समोर आलंय. अब्दुल्ला यांना दर महिन्याला ९ हजार रुपये गाळ्याच्या भाड्यातून मिळत होते. हे कुटुंब मात्र पायधुनी परिसरात भाड्याच्या घरात वास्तव्यास होतं. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं आणि वाढत्या खर्चांमुळे तणावातून या कुटुंबानं हा निर्णय घेतला का, याचा पोलीस आता शोध घेतायेत.(Dokadia Family Case)
 
कोणत्या स्वरुपाची एफआयआर करायची याबाबत संभ्रम
 
घरातील चारही मृतदेहांचा हिस्टोपॅथॉलॉजी अहवाल जेजे हॉस्पिटलनं मुंबई पोलिसांकडे सुपूर्द केलाय. आता या प्रकरणात नेमकी कोणत्या स्वरुपाची एफआयआर दाखल करायची, याचा पोलीस यंत्रणा विचार करते आहे.(Dokadia Family Case)
 
डोकाडिया कुटुंबातील चौघांचे मृतदेह २६ एप्रिल रोजी सापडले होते. या प्रकरणाच्या चौकशीत घरातील पिण्याच्या पाण्याचे आणि फ्रिजमध्ये ठेवण्यात आलेल्या कलिंगडाचा काही भाग तपासणीसाठी एफडीए आणि फॉरेन्सिक विभागाकडे पाठवण्यात आला होता. कलिंगडाच्या तपासणीत कोणतीही भेसळ झाल्याचं निष्पन्न झालं नसलं तरी झिंक फॉस्पाईड कलिंगडावर असल्याचं निष्पन्न तपासात झालं. या प्रकरणात हिस्टोपॅथॉलॉजी, एफडीए आणि एफएसएलचे तीन अहवाल आल्यानंतरही अद्याप कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोलीस पोहचू शकलेले नाहीत.(Dokadia Family Case)