चेन्नई (C. Joseph Vijay Key Welfare Promises TVK Manifesto) : सी. जोसेफ विजय यांनी शपथ घेताच ४८ तासात चार महत्वाचे निर्णय घेतले आहेत. सातशेहून अधिक मद्यविक्री केंद्र बंद केली, त्यासोबत दोनशे युनिट मोफत वीज, सोनसाखळी, अंगठी, रोख रक्कम देण्याचे वचन विजय यांनी जनतेला दिले.
१० मे रोजी सी. जोसेफ विजय यांचा शपथ विधी पार पडताच आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात नमूद केल्याप्रमाणे दोन महिन्यात पाचशे युनिट वीज खर्च करणाऱ्या घरगुती वीज धरकांना दोनशे युनिटपर्यंत मोफत वीज देण्यात येईल. ( C. Joseph Vijay Key Welfare Promises TVK Manifesto)
राज्याला नशेच्या विळख्यातून सोडवण्यासाठी आमली पदार्थाची तस्करी रोखण्याकरीता राज्याच्या प्रत्येक जिल्हात ६५ ‘एंटी-ड्रग टास्क फोर्स’ ची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच महिलांच्या सुरक्षेकरीता ‘सिंगप्पेन स्पेशल टास्क फोर्स’ ही ‘स्पेशल युनिट’ची नेमणूक करण्यात आली. या युनिटचे मुख्य काम हे महिला सुरक्षा, रॅपीड ॲक्शन अशा स्वरुपाचे असणार आहे. तसेच शैक्षणिक संस्था, बस स्थानक, धार्मिक स्थळांच्या पाचशे मीटर आवारातील सातशेहून अधिक मद्यविक्री केंद्रांवर बंदी घालण्यात आली आहे.
तसेच महिलांसाठीही काही महत्वाचे निर्णय सी. जोसेफ विजय यांनी निर्णय घेतले आहेत. ६० वर्षांपर्यंतच्या महिला ज्या आपल्या कुटुंबातील मुख्य व्यक्ती आहेत अशा महिलांना दरमहा २५०० रूपयांपर्यंतची (Monthly Financial Aid) सरकारी मदत केली जाईल. तसेच ‘अन्नपुर्णी सुपर सिक्स’ योजने अंर्तगत वर्षाला सहा ‘एलपीजी सिलेंडर’ (Free LPG) मोफत देण्याची घोषणा सी.जोसेफ विजय यांनी केली.
'अन्नन सीर थिट्टम' योजने अंतर्गत गरीब घरातील मुलींना लग्नात ८ ग्राम सोने आणि सिल्कची साडी भेट म्हणून दिली जाईल. (Gold and Marriage Assistance) ‘कामराज शिक्षा आश्वासन योजना’ ही नवी योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना रुपये १५ हजार पर्यंतची (Education Support) मदत केली जाईल. याच सोबत विद्यार्थांना उच्च शिक्षणासाठी वीस लाखांपर्यंत कर्ज मिळेल. बेरोजगार पदवीधारकांसाठी चार हजार रुपये तर
डिप्लोमाधारकांसाठी अडीच हजार रूपये बेरोजगारी भत्ता (Unemployment Allowance) मिळेल. ‘मुथलनवर मक्कल सेवाई ननबन’ योजने अंतर्गत ५ लाख मुलांना ग्रामीण स्थरावरील नोकरी दिली जाईल. तमिळनाडू राज्याची अर्थव्यवस्था मोठी असली तरी या योजनांनी आर्थिक अडचणी वाढणार आहे. राज्याच्या सुमारे ७५% उत्पन्नाची कमाई स्वत:च्या करांमधून होते, तर उर्वरित निधी केंद्राकडून मिळतो. २०२५-२६ मध्ये राज्याची जीएसडीपी दर ३५ लाख कोटी रूपये अपेक्षित आहे. मात्र राज्यावर १०.५ लाख कोटी रूपयांहून अधिक कर्ज आहे. महसुलातील मोठा हिस्सा वेतन, निवृत्ती वेतन, कर्जव्याजावर खर्च होत असून नवीन योजनेसाठी कमी निधी उरतो. मुख्यमंत्री विजय यांच्या या निर्णयामुळे राज्यावर आर्थिक भार वाढण्याची शक्यता आहे. C. Joseph Vijay Key Welfare Promises TVK Manifesto