धर्मांध महिलांचे करायचे काय?

    10-May-2026   
Total Views |

नाशिक येथील ‘कॉर्पोरेट जिहाद’ची आरोपी म्हणून निदा खानला नुकतीच अटक झाली. हिंदू महिला कर्मचार्‍यांना निदा खानचे सहकारी त्रास देत होते, धर्मांतरण करण्याचा प्रयत्न करत होते, शोषण करत होते, त्यावेळी निदा त्यांना साथ देत होती, त्यांच्या कटकारस्थानाला बळ देत होती. महिला म्हणून निदाला हिंदू महिला कर्मचार्‍यांबद्दल जराही कणव वाटली नाही? अनेक घटनांमध्ये अशा धर्मांध महिलांचा सहभाग वाढला आहे. अशा काही घटनांचा मागोवा या लेखात घेतला आहे.

मिरा-भाईंदरमधल्या एक 18 वर्षांच्या आधुनिक मुलीने आई-वडिलांचा अपमान करून, 28 वर्षांच्या मुस्लीम व्यक्तीबरोबर लग्न करायचे ठरवले. तिला भेटायला गेले होते. तिच्याशी चर्चा करताना कळले की, कामानिमित्त तिची ओळख त्याच्याबरोबर झाली. त्याने ईदला त्याच्या घरी बोलावले. हिने विचारले, “तुझ्या घरी जीन्स-टॉप घालून आले तर चालेल ना?” तर तो म्हणाला, “माझी मम्मी पण तुझ्यासारखीच आहे, ये तू.” ती त्याच्या घरी गेली. मेरी जान, मेरी बिटिया राणी, गुडिया वगैरे म्हणत त्याच्या अम्मीने, त्या मुलीचे स्वागत केले. बोलता-बोलता मुलीला सांगितले की, “इस्लामला उगीच बदनाम केले जाते, मी बघ किती खूश आहे. मला सगळं स्वातंत्र्य आहे.” मग तिने तिच्या कोणत्या तरी जावेबद्दलही त्या मुलीला सांगितले की, ”ती पूर्वी हिंदू होती, तिच्या घरी नेहमी घासपूस खायचे. माहेरी असताना हाडाची काडं होती पण, इथे येऊन दररोज मटण-चिकन खाऊन एकदम सुधरली. आमच्या इथे तुमच्यासारखे वारबीर पाळावे लागत नाहीत की, नेहमी उपासतापास करावे लागत. नवर्‍याला देव मानणंबिनणं आमच्याकडे नाही.”

त्यानंतर अम्मी दररोज तिच्या संपर्कात राहू लागली. मुलीची आई जितकी मुलीशी संवाद साधत नसेल, तिच्या आनंदाची काळजी घेत नसेल, तितकी ही अम्मई तिची काळजी घेऊ लागली (असे त्या मुलीचे म्हणणे). तसेच अम्मी तिच्या मुलाबद्दल सांगे की, “आजपर्यंत माझ्या मुलाने कुणा मुलीकडे ढुंकून पाहिले नाही. तुझ्यात असे काही खास आहे आणि आमचे पण पुण्य आहे की, तुझ्यामध्ये तो गुंतला आहे.” त्या व्यक्तीबद्दल हे सगळे ऐकून मुलगी प्रभावित झाली. पुढे काही दिवसांनी ती त्या मुलाच्या घरी गेली असता अम्मीने सरळ सांगितले, “मी तुझ्यासाठी खिमा/बिर्याणी बनवते, तोपर्यंत तू त्याच्याशी बोल. बघ, तो बेडरूममध्ये आहे.” हे असे नेहमी घडू लागले.

या दिलेल्या एकांतातूनच, त्या मुलीचे त्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंध सुरू झाले. विशेष म्हणजे, अम्मी घरात असतानाच हे सगळे व्हायचे. ‘तुझी अम्मी रागवेल’ असे तिने म्हटल्यावर तो म्हणे, ‘हमारे घर में एकदुसरे की खुशी देखी जाती हैं.’ दररोज चांगलेचुंगले चमचमीत खायला मिळेल, इतकी प्रेमळ आणि काळजी घेणारी आधुनिक सासू मिळेल, असे त्या मुलीला वाटले. तिने निर्णय घेतला की, सगळी हौसमौज पूर्ण होत असल्याने, त्याच्याशीच ‘निकाह’ करायचा! ही एक प्रातिनिधिक सत्यघटना.

दुसरी घटना इंदोरची. गेल्या वर्षी इंदोर येथे ‘लव्ह जिहाद’ची घटना घडली. त्यामध्ये अनेक हिंदू मुलींचे शोषण केले म्हणून साहिल, फरहान खान, अली खान, शाजी ऊर्फ शमसुद्दीन, अबरार आणि नबील वगैरेंवर गुन्हा दाखल झाला. यामध्ये एका मुख्य पीडितेने सांगितले होते की, “ती आरोपी मित्राबरोबर त्याच्या घरी गेली होती. तेव्हा त्याच्या घरी त्याची आई, बहीण आणि मेहुणा होता. ती आरोपीच्या खोलीत गेली तेव्हा, त्याने तिच्यावर जबरदस्ती केली. तिने विरोध केला, ओरडली; पण त्याच्या खोलीमध्ये कुणीच आले नाही. ती बाहेर आल्यावर आरोपीची बहीण म्हणाली, “रडून किंवा बाहेर इतरांना सांगून काय होणार? जे झाले, ते बदलणार आहे का? जे झाले, ते स्वीकार कर. आम्ही काही कमी पडू देणार नाही.” तर, मिरा रोड येथील नयानगर भागात, धर्म विचारून दोन सुरक्षारक्षकांवर चाकूने हल्ला करणार्‍या झैब जुबेर अन्सारी याच्या घरात चिठ्ठ्या सापडल्या. त्यात या चिठ्ठ्यांवर ‘खिलाफत’ची शपथ, तुमच्या मुशरिकनांना (मूर्तिपूजकांना) आता हिंदमध्ये खरा जिहाद दिसेल, अशा आशयाचे मजकूर लिहिलेले आहेत. त्याला त्याच्या पत्नीनेच कट्टरपंथी बनवले असावे, असा संशय महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने न्यायालयात व्यक्त केला.

जरा वस्तीपातळीवर पाहिले तर दिसेल की, 10-15 हिंदू मुलींच्या घोळक्यातही एक बुरखेधारी महिला असतेच आणि ती तिच्या इस्लामवर आणि ‘शरिया’ कायद्यावर ठाम असते. बुरखा घालते म्हणून दुनियेच्या वाईट नजरेपासून संरक्षण आहे, असे ती ठामपणे सांगते. ‘तू इतके दिवस रोजे कसे ठेवू शकतेस?’ असे एखादी हिंदू मैत्रीण तिला विचारते. तेव्हा ती हिंदू मैत्रिणीला सांगते, “मेहंगे मेहंगे कॉस्मेटिक लगाने से ग्लो नही आता. उलट, रोजे ठेवले तर रक्ताभिसरण सुधारून चेहर्‍यावर नूर (तेज) येतोे.” हिंदूंना निषिद्ध असलेले मटण खाल्ले, तर चेहरा चमकतो आणि ‘हड्डीयों में जान आती हैं,’ असेही मुद्दाम ठरवून सांगितले जाते. ‘जिम’मध्ये घडलेली ही घटना मी नेहमी सांगते. त्या हिंदू मुलीच्या सोबत त्या दोघी मुस्लीम युवती होत्या. ट्रेनरने सांगितले की, मांस-मटण खाणे जरा कमी करा. तर हिंदू मुली म्हणाल्या, “मटण आणि मच्छी नाही खायचे, हा डाएट करू शकत नाही.” यावर त्या दोन मुली म्हणाल्या, “माशाल्ला हमारी अम्मी जान डाएट बिर्याणी ओर शोरमा बनाती हैं. उद्या अम्मीला बनवायला सांगते, तुम्ही या घरी.” बिर्याणी आणि शोरमा डाएट असू शकतात का? पण, त्या 18-19 वर्षांच्या हिंदू मुली, डाएट मांसाहारी पदार्थांची रेसिपी विचारण्यासाठी त्या अम्मीला भेटणार होत्या. एक
ना अनेक!

सर्वांवर कडी म्हणजे, नुकताच समाज माध्यमांवर एक व्हिडिओ पाहण्यात आला. आपल्या देशातल्या कोणत्या तरी खेड्यातली बुरखाधारी महिला आक्रोश करत होती की, ‘गॅस हमारे इराण से आता हैं, हमको पहले मिलना चाहिये.’ काय म्हणावे? ‘तिहेरी तलाक’ कायदा महिलांच्या फायद्यासाठी होता पण, त्यालाही अनेकजणींचा विरोध. ही अशी मानसिकता का? काही लोकांचे म्हणणे आहे की, काफिरच्या बेटीचे धर्मांतरण करण्यास मदत केली म्हणून,‘मौत के बाद जन्नत नसिब होगी,’ असे त्यांना वाटते. तसेच ‘कयामत’च्या रात्री सगळी पापे माफ होतील, असाही त्यांचा समज असू शकतो. त्यांच्या मनावर बालपणापासून तसे ठसवलेले असते. त्यामुळेच, ‘पहिले हिजाब बाद में किताब’ असे नारे देणार्‍याही आहेतच. मात्र, कधीकधी वाटते की, या अशा धर्मांध महिला हतबल असू शकतात. कट्टरपंथी पुरुषांच्या ‘हो’ला ‘हो’ मिळवला नाही, तर आपल्याला एकटे पाडले जाईल आणि त्यांच्या म्हणण्यानुसार जर वागलो, तर आपल्याला थोडातरी सन्मान मिळेल असेच त्यांना वाटत असावे. त्यामुळेच त्या अशा धर्मांध होत असतील. त्यांना मृत्यूनंतर जन्नत मिळत असेल की, नाही माहिती नाही पण, जिवंत असताना माणसासारखे जगणे नक्कीच नशिबी नसेल.

काही लोक म्हणतात की, तू मानवतावादी भूमिका मानते असे सांगतेस. मग मुस्लीम महिलांच्या बाबतीत असे का लिहितेस? तर, मुळात मी त्यांच्या विरोधात मत मांडत नाही. तर, त्यांना धर्मसंस्काराच्या नावावर जे काही सांगितले जाते, त्यावर त्या किती ठाम असतात आणि एकनिष्ठ असतात, हेच आपल्या हिंदू मुलींच्या समोर आणायचे आहे. अनेक घटनांमधून दिसते की, ‘लव्ह जिहाद’ किंवा आत्मघातकी विस्फोटामध्ये, कट्टरपंथी महिलांचा सहभाग वाढला आहे. का? तर, केवळ काफिराच्या जगाने इस्लाममय व्हावे म्हणून (???); हे सगळे मला हिंदू महिला म्हणून अनाकलनीय वाटते. त्यामुळे हे अनुभव लिहिले इतकेच. बाकी, या धर्मांध महिलांचा संतापही येतो आणि कीवही येते कारण, त्यांचे जगणे म्हणजे

न ज़मीन मिली न फलक मिला,
हैं सफर में अंधा परिंदा
जिस राह की मंजिल नहीं,
हैं सफर में अंधा परिंदा।

9594969638

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.