Maharashtra Day 2026 : महापुरुषांनी केलेला त्याग, बलिदान आणि जिद्दीचे स्मरण करण्याचा आजचा दिवस - एकनाथ शिंदे

    01-May-2026
Total Views |
Eknath Shinde
 
मुंबई : (Maharashtra Day 2026) "मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा.प्रमाण घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा. याप्रसंगी तमाम महापुरुषांना अभिवादन करून, राज्यातील श्रमिकांना कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो. आजचा दिवस हा या महापुरुषांनी केलेला त्याग दिलेले बलिदान आणि जिद्दीचे स्मरण करण्याचा आहे.
 
आपले राज्य आज सर्वच बाबतीत अग्रेसर आहे. राज्य हे देशाचे मॅन्युफॅक्चरिंग हब असून, पायभूत सुविधांचे जाळे इथे विकसित झाले आहे. आज आपण मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचे लोकार्पण करत आहोत. राज्यातील अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प राज्याला नवीन ओळख मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत."असे प्रतिपादन प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवार दि.१ रोजी दिली.(Maharashtra Day 2026)
 
राज्याच्या ६७व्या स्थापना दिनानिमित्त शुक्रवार दि.१ रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरातील साकेत पोलीस मैदानात आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्याला उपस्थित राहून ध्वजवंदन केले.(Maharashtra Day 2026)
 
"महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने बीड येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी राष्ट्रध्वजास वंदन केले. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, विकासासाठी आणि जनसेवेसाठी सदैव कटिबद्ध राहण्याचा निर्धार यावेळी पुन्हा दृढ केला.
 
याप्रसंगी सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.जय महाराष्ट्र!" अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या एक्स हँडलवरून शुक्रवार दि.१ रोजी व्यक्त केली आहे.(Maharashtra Day 2026)
 
 
"१०६ हुतात्म्यांच्या बलिदानानंतर दीर्घकाळ चाललेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या योगदानानंतर मराठी भाषिकांच राज्य म्हणून १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मीती झाली.आणि राज्याचे शिल्पकार स्व.यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश शिवाजी पार्कच्या ऐतिहासिक मैदानावरती देशाचे पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्विकारला.गेल्या ६७ वर्षात राज्याने कृषी क्षेत्र,औद्योगिक क्षेत्र ,कला, क्रीडा,सांस्कृतिक यांसह सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली आहे.अशा गौरवशाली महाराष्ट्राच्या वर्धापन दिनाच्या सर्वांनाच अंतकरणापासून शुभेछा.'असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी शुक्रवार दि.१ रोजी केले.(Maharashtra Day 2026)
 
"आजचा दिवस राज्यातील मराठी माणसासाठी अभिमानास्पद आहे.राज्यातील तमाम जनतेला महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाच्या हार्दिक शुभेछा देतो.परराज्यातून अनेक व्यक्ती आय ए एस म्हणून महाराष्ट्रात आलेले आहेत त्यांनी देखील मराठी शिकली, मराठीचा पेपर दिला.तो आदर्श इतरांनी घ्यावा.तसेच १ मे ते १५ मे पर्यंत राज्यात जी स्व गणना होत आहे त्यात नागरिकांनी सहभाग नोंदवावा.२०११ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच जी जनगणना होते त्यात राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून सर्वांनी सहभागी व्हावे." असे आवाहन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवार दि.१ रोजी केले.(Maharashtra Day 2026)