मुंबई : (Vadhavan Port) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी महाराष्ट्रातील वाढवण बंदर (Vadhavan Port) ते तवा गाव (NH-48) दरम्यान चार मार्गीका असणारा एक्सप्रेस-वे उभारण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी निविदा खुल्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये २,३६० कोटीं किमतीसह जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड आणि शिंदे डेव्हलपर्स प्रा.लि.यांनी बाजी मारली आहे. या कंपन्यांना प्रकल्प उभारण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी लेटर ऑफ अवॉर्ड जारी केले. हा प्रकल्प ईपीसी तत्त्वावर उभारण्यात येईल.(Vadhavan Port)
देशातील सर्वात मोठ्या वाढवण बंदरापर्यंत (Vadhavan Port) पोहचण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) वरोर, वाढवण – तवा दरम्यान ३२.१८० किमी लांबीच्या द्रुतगती महामार्गाचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.(Vadhavan Port)
वाढवण बंदर ते तवा गाव हा ३२.१ किमी लांबीचा अॅक्सेस-कंट्रोल्ड एक्सप्रेस-वे दिल्ली–मुंबई एक्सप्रेसवे (NE-4) आणि एनएच-४८ यांना जोडणार आहे. या मार्गामुळे वाढवण बंदरासाठी (Vadhavan Port) जलद व सुलभ कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल. या प्रकल्पात ८०० मीटर लांबीचा दुहेरी बोगदा, दोन मोठे पूल, ३३ लहान पूल, सहा फ्लायओव्हर, ८४ कल्व्हर्ट, रेल्वे ओव्हरब्रिज तसेच विविध अंडरपास आणि इंटरचेंजचा समावेश आहे. भविष्यात हा मार्ग आठ मार्गिकांपर्यंत विस्तारण्याचीही तरतूद आहे.(Vadhavan Port)
भारतातील सर्वात मोठे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असणारे वाढवण बंदर २३.२ दशलक्ष टीइयु क्षमतेसह देशातील महत्त्वाचे बंदर (Vadhavan Port) म्हणून विकसित करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १५ दशलक्ष टीइयु क्षमता २०३० पर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. हा एक्सप्रेसवे पूर्ण झाल्यानंतर वाढवण बंदर हे राज्यातील इतर मार्गांशीही जोडले जाईल.(Vadhavan Port)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.