UAE Pakistan loan: मित्रच झाला कठोर! संयुक्त अरब अमीरातकडून पाकिस्तान वर २ अब्ज डॉलर परतफेडीचा दबाव, आर्थिक संकट गडद?

Total Views |
 
UAE Pakistan loan
 
मुंबई: (UAE Pakistan loan) मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरातने ‘मित्र’ मानल्या जाणाऱ्या पाकिस्तान वर कर्ज परतफेडीचा दबाव वाढवला आहे. एप्रिल २०२६ पर्यंत २ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत करण्याची स्पष्ट मागणी करण्यात आली आहे. (UAE Pakistan loan)
 
युएईने याआधी पाकिस्तानला दिलेल्या कर्जावर वारंवार मुदतवाढ (रोलओव्हर) दिली होती. मात्र, सध्याच्या जागतिक आणि प्रादेशिक परिस्थितीत अबू धाबीने धोरण बदलत कर्ज परतफेडीवर ठाम भूमिका घेतली आहे. (UAE Pakistan loan)
 
पाकिस्तान सरकारने संपूर्ण कर्ज एकाच वेळी फेडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वेळापत्रकही निश्चित करण्यात आले आहे: (UAE Pakistan loan)
 
११ एप्रिल: ४५० डॉलर
१७ एप्रिल: २ अब्ज डॉलर
२३ एप्रिल: १ अब्ज डॉलर
 
विशेष म्हणजे, १९९६-९७ मध्ये घेतलेले ४५० मिलियन डॉलर्सचे कर्ज जवळपास ३० वर्षे रिन्यू होत राहिले होते, तेही आता पूर्णपणे फेडले जाणार आहे. (UAE Pakistan loan)
 
हेही वाचा: डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष की ‌‘किंग‌’? 
 
तणावाचे मूळ कारण काय?
 
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण-इस्रायल संघर्ष आणि अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे अधिक गंभीर झालेली परिस्थिती. यामुळे रियाधमध्ये झालेल्या इस्लामिक देशांच्या बैठकीत पाकिस्तानने अमेरिका-इस्रायलच्या कारवाईवर आक्षेप घेतल्याने युएईसोबतचे संबंध ताणले गेल्याचे मानले जात आहे. (UAE Pakistan loan)
 
पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती कशी?
 
पेट्रोल दर: ₹३७८ प्रति लिटर (सुमारे ५०% वाढ)
अचानक ₹८० दरकपात करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न
 
जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा फटका भारतासह पाकिस्तानलाही बसत आहे. (UAE Pakistan loan)
 
याचा पाकिस्तानवर काय परिणाम होऊ शकतो?
 
तज्ज्ञांच्या मते, कर्जाची एकरकमी परतफेड पाकिस्तानसाठी मोठा आर्थिक ताण ठरू शकतो. IMF आणि इतर कर्जांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय आव्हानात्मक ठरू शकतो असे म्हटले जात आहे. त्यासोबतच आखाती देश पाकिस्तानपासून धोरणात्मक अंतर ठेवत असल्याचे संकेत यातून मिळत आहेत. (UAE Pakistan loan)
 
 

मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com