Ramlal Women Empowerment speech : भारतातील स्त्री परंपरेने सशक्त; तिला अधिकाधिक संधी देण्याची गरज!

अखिल भारतीय संपर्क प्रमुख रामलाल यांचे प्रतिपादन

    04-Apr-2026   
Total Views |
Ramlal Women Empowerment speech
 
मुंबई : (Ramlal Women Empowerment speech) भारतातील स्त्री परंपरेने सशक्त आहे. तिला अधिकाधिक संधी देणे आवश्यक असून, तिच्या वाटेतील अडथळे दूर करण्याचे काम समाजाने करायला हवे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख रामलाल यांनी केले. मरुधरा नारी सशक्तिकरण संगठन (मनसा) (Ramlal Women Empowerment speech) जयपूर महानगरतर्फे राजस्थान विद्यापीठाच्या मानविकी सभागृहात आयोजित “प्रमुख जन गोष्ठी” कार्यक्रमात ते बोलत होते.
 
उपस्थितांना संबोधत ते म्हणाले, ईश्वराने स्त्रीला पुरुषांच्या तुलनेत अधिक गुण देऊन निर्माण केले आहे. स्त्री जे कार्य हाती घेते, ते ती गंभीरता, काळजी आणि समर्पणाने पूर्ण करते. त्यामुळे त्या कार्याच्या यशाची शक्यता अधिक असते. संघ प्रेरणेने चालणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. संघाची शंभर वर्षांची वाटचाल उपेक्षेपासून सुरू होऊन समाजाच्या पाठिंब्याने पुढे सरकत आहे. स्वयंसेवकांनी अनेक अडचणी, बंदी आणि यातना सहन करून संघकार्य पुढे नेले आहे. संघात जात, भाषा, प्रांत किंवा कोणत्याही स्तरावर भेदभावाला स्थान नाही. देशभक्त नागरिक असलेले देशच प्रगती करतात, असेही त्यांनी सांगितले. संघ आपल्या कार्यकर्त्यांमध्ये देशभक्ती, समाजसेवा आणि शिस्त यांसारख्या गुणांचा विकास करतो.(Ramlal Women Empowerment speech)
 
पुढे त्यांनी सांगितले की, भारतीय संस्कृती ही वैज्ञानिक मूल्यांवर आधारित आहे. निसर्ग आणि पर्यावरणाचे संवर्धन आपल्या कुटुंबव्यवस्थेत सहजपणे केले जाते. हे मूल्य पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी मातृशक्तीची आहे. त्यांनी महिलांना पाणी बचत, वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्ती, आठवड्यातून एक दिवस मोबाईल-इंटरनेटविना कुटुंबासोबत वेळ घालवणे, स्व-ओळख, मातृभाषा, स्वदेशी अन्न आणि देशांतर्गत पर्यटन यांना प्रोत्साहन देण्यासाठी कुटुंबात वातावरण निर्माण करण्याचे आवाहन केले.(Ramlal Women Empowerment speech)
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक