मुंबई : (Nashik Car Accident) नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे झालेल्या एका भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाला असून यात ६ चिमुकल्यांचा समावेश आहे.(Nashik Car Accident)
शुक्रवारी, इंदोरे गावातील दरगोडे कुटुंब आपल्या कारने दिंडोरी येथील एका खासगी क्लासेसच्या स्नेहमिलनाच्या कार्यक्रमाला गेले होते. रात्री १० वाजताच्या सुमारास कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार पाण्याने भरलेल्या एका विहीरीत जाऊन कोसळली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.(Nashik Car Accident)
मृत व्यक्तींमध्ये सुनील दत्तात्रय दरगोडे (३२), रेश्मा सुनील दरगोडे (२७), आशा अनिल दरगोडे (३२), गुणवती सुनील दरगोडे (११), श्रेयश अनिल दरगोडे (११), श्रावणी अनिल दरगोडे (११), सृष्टी अनिल दरगोडे (१४), समृद्धी राजेंद्र दरगोडे (७), श्रद्धा अनिल दरगोडे (१३) यांचा समावेश आहे.(Nashik Car Accident)
या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले. भाजप नेते गिरीश महाजन यांनीही घटनास्थळाची पाहणी करत मृतांच्या कुटुंबियांशी त्यांनी संवाद साधला. दिंडोरीचे आमदार तथा मंत्री नरहरी झिरवळ यांनीही घटनास्थळी जाऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली.(Nashik Car Accident)
राज्य सरकारतर्फे मदत जाहीर
या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना ५ लाख आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येणार आहे. तसेच या घटनेची चौकशी करण्याचे आदेशही जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.(Nashik Car Accident)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....