दहशतवाद्याचे आणि दहशतवादाचे समर्थन करणारे विधान केले म्हणून फ्रान्समध्ये ‘ला फ्रान्स इन्सोमिझ’ पक्षाच्या खासदार असलेल्या रिमा हसन हिला नुकतीच अटक करण्यात आली. यावर जगभरातले आणि त्यातही आपल्या भारतातले काही निधम तथाकथित पुरोगामी आणि फक्त हिंदू सोडून सगळ्यांचा कळवळा येणारे मानवतावादी यथाशक्ती रडगाणे गात आहेत की, “फ्रान्समध्ये दडपशाही सुरू आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घातला गेला आहे. रिमा हसन हिला व्यक्तिस्वातंत्र्य नाही का? ती तिचे मत व्यक्त करू शकत नाही का?” पण, फ्रान्सचे म्हणणे आहे, दहशतवादी आणि दहशतवाद्यांचे समर्थक यांच्याबाबत शून्य सहानुभूती. ‘झिरो टॉलरन्स’!
रिमा हसन ही तशी जगभरातल्या डाव्या विचारसरणी, तसेच धर्मांधांसाठी अगदी ‘आयकॉन’, ‘आयडॉल’, आदर्शच म्हणा ना! अगदी मानवतेचा आवाज, ‘अमन का संदेश’ वगैरे वगैरे त्यांचे तिच्याबाबत मत आहे. हे का? कारण, रिमा पॅलेस्टाईनमुक्तीसाठी बोलत असते, इस्रायलचा विरोध करते म्हणून. पॅलेस्टाईन हा स्वतंत्र देश आहे, इस्रायलचा काही संबंध नाही, असे ती वारंवार म्हणत असते. तसेच पॅलेस्टाईनचे नागरिक निरपराध-निष्पाप आहेत. त्यांच्यावर इस्रायल उगीचच हल्ला करतो, असेही तिचे म्हणणे, तर अशी ही रिमा गेल्यावर्षी ग्रेटा थनबर्गबरोबर पॅलेस्टाईनचे समर्थन करण्यासाठी इस्रायलला जात होती. पण, इस्रायलने क्षणाचाही वेळ न दवडता तिच्यासकट सर्व पॅलेस्टाईन-समर्थकांवर चांगलीच कारवाई केली. तेव्हा ती विद्रोह, विरोध वगैरे वगैरे न करता परतली होती. तेव्हापासून तर इस्रायलविरोधात सातत्याने ती आगपाखड करतेच करते, तो करण्यासाठी ती जगभर प्रवासही करते. इस्रायल कसा पॅलेस्टाईनवर अत्याचार करतो, ते सांगत फिरते. त्यासाठी व्याख्याने, परिसंवाद वगैरे घेत असते.
या सगळ्यामुळे फ्रान्समधल्या मुस्लिमांची ती गळ्यातील ताईत झाली. त्यामुळेच कधीकाळी शरणार्थ म्हणून आलेली रिमा फ्रान्समध्ये खासदार झाली. अर्थात, राजकारण विषयच असा आहे की, ज्यामुळे राजकारण्यांना सत्ता मिळते, तो विषय राजकारणी कधीच संपू देत नाहीत. त्यामुळे हाडाची राजकारणी असलेल्या रिमानेही पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्ष, निष्पाप पॅलेस्टाईन, खलनायक इस्रायल वगैरे म्हणत हाच विषय पुढे चालूच ठेवला. अशातच, फ्रान्समध्ये धर्मांध मुस्लिमांचा कट्टरतावाद वाढत होता. त्यांना रिमामुळे जोर आला. फ्रान्सच्या मुसलमानांनी पॅलेस्टाईनसाठी हिंसक आंदोलने सुरू केली. सीरियाच्या शरणाथ शिबिरात जन्मलेली आणि पुढे वयाच्या नवव्या वष फ्रान्समध्ये आलेल्या रिमावर फ्रान्सचे उपकारच. पण, रिमासारख्यांना ‘मुस्लीम ब्रदरहुड’पुढे देशाचे काय हो? तिने आंतरराष्ट्रीय कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. जगभरातल्या शरणाथ शिबिराचा अभ्यास करण्यासाठी 2019 मध्ये ‘शरणाथ शिबीर वेधशाळे’ची स्थापना केली. पुढे 2023 साली ‘ॲक्शन फिलिस्तीन फ्रान्स’ समूहाची स्थापना केली.
तर अशा या रिमा हसनला अटक झाली. याचे कारण, तिने समाजमाध्यमांवर केलेले एक विधान. त्याचा संदर्भ आहे 1972 साली इस्रायलच्या लोड आंतरराष्ट्रीय विमानतळावर पॅलेस्टाईनमुक्ती-सेनेसोबत जपानी ‘रेड आम’ने हल्ला केला. त्यात 24 लोक ठार झाले, तर 80 लोक जखमी झाले होते. यात अनेक ‘ज्यू’ मारले गेले. या हल्ल्याचा जपानचा हल्लेखोर कोझो ओकामोतो याला इस्रायलने शिक्षा दिली. मात्र, पुढे आंतरराष्ट्रीय वाटाघाटीमध्ये त्याला सोडून देण्यात आले. ओकामोतो बैरूतमध्ये ‘पीएफएलपी’च्या संरक्षणाखाली राहू लागला. या हल्ल्याच्या स्मरणार्थ समाजमाध्यमांवर एक संदेश प्रसारित झाला. त्यावर रिमा हसनने ओकामोतो याच्यावर काही विधान केले. तिचे विधान हे दहशतवाद्याचे समर्थन करते, असे म्हणत तिला फ्रान्समध्ये अटक कररण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर वाटते, रिमासारख्या व्यक्तींची मानवता केवळ पॅलेस्टाईनच्या मुस्लिमांसाठीच आहे का? ‘हमास’च्या क्रूर हल्ल्यात मृत पावलेल्या, अत्याचाराला बळी गेलेल्यांसाठी यांची मानवता मरते का? अर्थात, याचे उत्तर रिमा हसनसारख्या लोकांकडे नाही. कारण, मानवतावादी मुखवट्याआडचे त्यांचे खरे स्वरूप हे वेगळे आहे. जगभरात ‘शरिया’ कायदा लागू करणाऱ्या कट्टरपंथीयाचे समर्थक, साहाय्यक हेच त्यांचे खरे रूप आहे.
9594969638