
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुंब्रा येथे आयोजित सभेत हिंदुत्ववादी भूमिकेवर ठाम मत मांडत मंत्री नितेश राणे यांनी मुंब्रा परिसर भगवामय करण्याचा निर्धार व्यक्त केला. जोपर्यंत मुंब्रा देवीच्या प्रत्येक घरावर आपण भगवा झेंडा फडकवत नाही तोपर्यंत स्वस्थ बसायचं नाही. इस्लामपूरचे ईश्वरपूर करून दाखवलं. म्हणून मुंब्राचं पण मुंब्रादेवी करून दाखवणार. अशी स्पष्ट भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली.
शिळफाटा येथे आयोजित हिंदुसंमेलनात उपस्थितांना संबोधत नितेश राणे म्हणाले, आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करण्यासाठी येथे जमलो आहोत. आज तुमच्या आजूबाजूला वावरतात ते औरंग्याचे आणि टिप्याचे पिल्ल आहेत. जे ह्या मातीशी गद्दारी करून या हिंदू राष्ट्राशी गद्दारी करून त्या औरंग्याला परत जिवंत करण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदू समाज म्हणून तुम्ही लोकांनी ओळखलं पाहिजे. आज ज्या ज्या मशिदीतून माझं हे भाषण ऐकतायत त्यांना कळू दे, हा तुमच्या अब्बाचा पाकिस्तान नाहीये. हे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदूराष्ट्र आहे".
यावेळी एमआयएमच्या नगरसेविकेचाही नितेश राणेंनी समाचार घेतला. ते म्हणले," आज कोणी उठतं आणि आम्हाला आव्हान देतात. जे काय भाषणामध्ये बोलतात हे काय ठीक आहे की काय? आजकालची मुलं आहेत. थोडा काय लोकप्रतिनिधी झाल्यानंतर इसको हम हरा कर देंगे. समजून घ्या त्या लोकांना लहानपणापासून हे शिकवलं जातं. मदरस्यामध्ये बसलेले लोक हे शिकवतायत. त्या मदरसांमध्ये बसून फक्त आतंकवादी घडवले जातात आणि म्हणून यांच्या तोंडातून हे सगळे विचार बाहेर येतात. आम्ही आता धर्म स्वातंत्र्य कायदा पर्यंत पोहोचलोय. आता पुढचा टप्पा मदरसांचा आहे".
पुढे ते म्हणाले, "माझ्या मुंब्रादेवीच्या प्रत्येक हिंदू समाजाला जे जे माझे भाषण ऐकत आहेत त्यांना आम्हाला विश्वास द्यायचे आहे की, तुम्ही कसलीही चिंता करू नका. तुम्ही एकटे नाहीत. तुम्हाला कोणी काही धमक्या देत असेल, कोणी वाकड्या नजरेने बघत असेल तर फक्त आम्हाला सांगा. फक्त रिव्हर्स मारून बुलडोझर मुंब्य्रात फिरवायचा बाकी काही नाही.".