Iran Rejects Pakistan's Mediation : पाकिस्तानचा मध्यस्थीचा प्रस्ताव इराणने फेटाळला!
अमेरिकेच्या अटी अमान्य असल्याचे खडसावले
04-Apr-2026
Total Views |
मुंबई : (Iran Rejects Pakistan's Mediation) इराण-अमेरिका शांतिवार्तेमध्ये मध्यस्थ म्हणून मिरवण्याचा पाकिस्तानचा डाव फसला असून, इराणने पाकिस्तानची मध्यस्थता मान्य नसल्याचे म्हटले आहे. तसेच इराणने अमेरिकेच्या शिष्टमंडळाला भेटण्यासही नकार दिल्याने, या युद्धातील शांततेप्रक्रियेवर पुन्हा एकदा अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे.(Iran Rejects Pakistan's Mediation)
इस्रायल अमेरिका आणि इराण यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळे जागतिक संकट निर्माण झाले असून, या युद्धात इराणच्या भूमिकांमुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी प्रभावित झाल्याने जगासमोरचे आधीच असलेले संकट अधिकच तीव्र झाले आहे. अशावेळी या युद्धामध्ये दोन्ही पक्षांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी पाकिस्तानने उचल खालली होती. दोन्ही देशातील शिष्टमंडळाची भेट पाकिस्तानातील इस्लामाबाद येथे पाकिस्तानच्या नेतृत्वामध्ये होणार होती. अमेरिकेने पकिस्तानच्या या मध्यस्थीला मान्यता देताना, इस्लामाबाद येथे शिष्टमंडळ पाठवण्याला मान्यता दिली होती. ही भेट झाली असती, तर पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय प्रतिमा सुधारण्यास यामुळे मदत झाली असती. अमेरिकेने या भेटीला मान्यता दिल्यामुळे जागतिक राजकारणातील प्रतिमा उत्थानाची स्वप्ने पाकिस्तानला पडू लागली होती.(Iran Rejects Pakistan's Mediation)
मात्र, इराणकडून पाकिस्तानची ही मध्यस्थताच मान्य नसल्याचे जाहीर करण्यात आल्याने पाकिस्तानच्या या स्वप्नांवर पाणी पडले आहे. इराणने विश्वासाचे कारण देत पाकिस्तानची मध्यस्थता नाकारली असून, अमेरिकेच्या कोणत्याही मागण्याही अमान्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.(Iran Rejects Pakistan's Mediation)
दरम्यान, यामध्ये गेले जवळपास महिनाभरापेक्षा जास्त सुरु असलेल्या युद्धामध्ये मध्यस्थता कोण करणार हा प्रश्न असून, कतारचे नाव चर्चेत आहे. मात्र, अलीकडेच इराणने अमेरिकेची ‘एफ 35’ सारखी अद्यायावत विमाने पाडून, त्यांच्या वैमानिकांना अटक केल्याने दोन्ही देशातील संघर्ष चिघळण्याची शक्यता वाढली आहे.(Iran Rejects Pakistan's Mediation)
इस्रायलकडूनही पाकिस्तानला आरसा...
इराण आणि अमेरिका युद्धामध्ये मध्यस्थाच्या भूमिकेसाठी आग्रही असणार्या पाकिस्तानला इस्रायली परराष्ट्र मंत्रालयाच्या विशेष दूत फ्लर हसन नाहूम यांनी यापूर्वीच आरसा दाखवला होता. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये पाकिस्तानवर टीका करताना त्या म्हणाल्या की, “पाकिस्तान काय विचार करतो माहित नाही, पण या मध्यस्थेतेआड ते स्वत:चे महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.” तसेच, सध्या जागतिक दहशतवादच्या प्रसारामध्ये पकिस्तानचे योगदान मोठे असून, तेच जगासाठी एक समस्या असल्याची टीकादेखील त्यांनी केली. वरकरणी पाकिस्तान प्रयत्न करूच शकतो, पण त्यांना यश मिळेल असे वाटत नसल्याचेही नाहूम यांनी म्हटले होते.(Iran Rejects Pakistan's Mediation)