Nashik Dindori accident: रस्त्याच्या मध्यभागी विहीर… ६ चिमुकल्यांसह ९ जणांचा मृत्यू! दिंडोरी अपघाताने राज्य हादरलं, पण नेमकं काय घडलं होत?

Total Views |
 
Nashik Dindori accident
 
नाशिक: (Nashik Dindori accident) नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे शुक्रवारी, ३ एप्रिल रोजी रात्री घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण राज्य हादरले आहे. भरधाव वेगाने जाणारी कार रस्त्याच्या मधोमध असलेल्या पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळल्याने एकाच कुटुंबातील ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरगोडे कुटुंब खाजगी क्लासेसच्या स्नेहसंमेलनावरून घरी परतत असताना रात्री सुमारे १० वाजता हा अपघात झाला. कार थेट विहिरीत कोसळल्याने सर्वांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये ६ लहान मुलांचा समावेश असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Nashik Dindori accident)
 
एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे: (Nashik Dindori accident)
 
सुनील दत्तात्रय दरगोडे (३२) 
रेशमा सुनील दरगोडे (२७)
आशा अनिल दरगोडे (३२)
गुणवती सुनील दरगोडे (११)
श्रेयश अनिल दरगोडे (११)
श्रावणी अनिल दरगोडे (११)
सृष्टी अनिल दरगोडे (१४)
समृद्धी राजेंद्र दरगोडे (७)
श्रद्धा अनिल दरगोडे (१३)
 
सर्व मृत इंदोरे गाव येथील रहिवासी होते. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून नातेवाईकांचा आक्रोश हृदयद्रावक होता. दरम्यान आता या प्रकरणी विहीर मालक राजेंद्र राजे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Dindori accident)
 
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेची दखल घेत मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. (Nashik Dindori accident)
 
भाजप नेते गिरीश महाजन यांनीही घटनास्थळाची पाहणी करत, फोनवर डॉक्टर आणि पोलिसांशी संपर्क साधला. लोकांशी चर्चा केली. तसेच मृतांच्या कुटुंबियांशीही त्यांनी संवाद साधला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी या प्रकराबद्दल दु:ख व्यक्त करत. ” गंभीर घटना आहे, रस्त्याच्या मधोमध विहीर कशी असू शकते ?” असा सवाल त्यांनी विचारला. या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये जाहीर करण्यात आले आहेत, असं सांगत जे जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर देखील सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला जाईल” असं महाजन यांनी नमूद केलं. (Nashik Dindori accident)
 
दिंडोरीचे आमदार आणि मंत्री नरहरी झिरवळ यांनी घटनास्थळी जाऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली. तेथील अधिकारी, डॉक्टर यांच्याशी संवाद साधत, जी घटना घडली ती अत्यंत वाईट आहे, ९ जणांचा मृत्यू झालायं. ही विहीर रस्त्याच्या मधोमध आहे, असं कसं होऊ शकतं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल, मी स्वतः चौकशीचे आदेश दिले आहेत असं सांगत ही विहीर तातडीने बुजवली जाईल असंही झिरवळ यांनी नमूद केलं. (Nashik Dindori accident)
 

मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com