CM Devendra Fadnavis : सर्व पक्षांनी मन मोठे करून बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    04-Apr-2026   
Total Views |
CM Devendra Fadnavis
 
नागपूर : (CM Devendra Fadnavis) सर्व पक्षांनी मन मोठे करून बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केले आहे.(CM Devendra Fadnavis)
 
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर होणारी बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी होत असतानाच काँग्रेसने ही पोटनिवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. लवकरच काँग्रेस या जागेसाठी उमेदवारही घोषित करण्याची शक्यता आहे. यावर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, "बारामती पोटनिवडणूकीत सर्वच पक्षांनी सुनेत्रा पवार यांना पाठींबा दिला पाहिजे. ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर, महाराष्ट्राला साजेशी परिस्थिती होईल. यापूर्वीही अनेकवेळा महाराष्ट्राने बिनविरोध पोटनिवडणूका केल्या आहेत. आर. आर. पाटील यांच्या दु:खद निधनानंतरही पोटनिवडणूक न लढण्याचे भाजपने ठरवले होते. त्यामुळे सगळ्या पक्षांनी मन मोठे करून ही निवडणूक बिनविरोध केली पाहिजे, असे मला वाटते."(CM Devendra Fadnavis)
 
हेही वाचा : Nashik Dindori accident: रस्त्याच्या मध्यभागी विहीर… ६ चिमुकल्यांसह ९ जणांचा मृत्यू! दिंडोरी अपघाताने राज्य हादरलं, पण नेमकं काय घडलं होत? 
 
दिंडोरीतील अपघात दुर्दैवी
 
"दिंडोरीतील अपघाताची घटना अतिशय दुर्दैवी आहे. काही लहान मुले आणि त्यांची आई गाडीमध्ये असून ती गाडी विहीरीत पडली. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळावरून माझ्याशी चर्चा केली असून तिथली परिस्थिती सांगितली. इतक्या लहान मुलांचे असे निधन होणे यापेक्षा अधिक आक्रोश आणि दु:ख दुसरे कुठलेच असू शकत नाही. त्या विहीरीला अतिशय छोटा कठडा होता आणि ती मध्यभागी होती. त्यामुळे ही घटना घडल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येत आहे. या संपूर्ण कुटुंबाच्या प्रति मी संवेदना व्यक्त करतो. त्या कुटुंबाला मदत घोषित केली आहे. यासोबतच रस्त्याच्या मध्ये किंवा रहदारीच्या ठिकाणी असलेल्या विहीरींचे तात्काळ ऑडिट करून उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतू, ही घटना प्रचंड वेदना देणारी आहे," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले.
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....