Tukdoji Maharaj Jayanti : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना राज्यपालांचे तसेच मंत्रालयात अभिवादन
30-Apr-2026
Total Views |
मुंबई : (Tukdoji Maharaj Jayanti) राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन मुंबई येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे सहसचिव एस. राममूर्ती, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे तसेच लोकभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.(Tukdoji Maharaj Jayanti)
राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांनी मंत्रालय येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.(Tukdoji Maharaj Jayanti)
यावेळी अवर सचिव रामदास कोळेकर, कक्ष अधिकारी निलेश हरड आणि मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.(Tukdoji Maharaj Jayanti)