मुंबई : (Nida Khan CDR report) नाशिक येथील एका आयटी कंपनीच्या बीपीओमध्ये हिंदू महिलांच्या लैंगिक शोषण आणि जबरदस्ती धर्मांतर प्रकरणात नवे खुलासे समोर आले आहेत. पोलीस तपासात आरोपी निदा खानविरुद्ध अनेक महत्त्वाचे धागेदोरे मिळाले असून संशय अधिक गडद झालाय. कॉल डिटेल रेकॉर्ड अहवालानुसार, प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासांतच तिने मुंब्रा, नाशिक आणि भिवंडी येथे संपर्क साधला होता. या संपर्कांद्वारे संपूर्ण जाळ्यापर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, निदा खानच्या अग्रिम जामीन अर्जावर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला असून पुढील सुनावणी २ मे रोजी होणार आहे.(Nida Khan CDR report)
मिळालेल्या वृत्तानुसार, पोलिसांच्या हवाल्याने सांगण्यात आले की, एफआयआर नोंदवल्यानंतर लगेचच निदा खानने मुंब्रा, नाशिक आणि भिवंडी येथील अनेक ठिकाणी संपर्क साधला होता. हे फोन कॉल्स नेमके का करण्यात आले, याची सखोल चौकशी सध्या सुरू आहे. या कॉल्सद्वारे पुरावे लपविणे किंवा सहकाऱ्यांना सतर्क करण्याचा प्रयत्न झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.(Nida Khan CDR report)
या प्रकरणात तपास अधिक वेगाने सुरू असून संशयित ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. यासोबतच कॉल रेकॉर्ड, लोकेशन डेटा आणि इतर डिजिटल पुरावे गोळा करून आरोपींची अचूक टाइमलाइन तयार करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती आहे.(Nida Khan CDR report)
एसआयटी तपासात निदा खानवर (Nida Khan CDR report)आरोप आहे की, ती कंपनीतील हिंदू महिलांना आपल्या घरी घेऊन जाऊन त्यांना नमाज पठण, हिजाब आणि बुरखा परिधान करण्याचे प्रशिक्षण देत होती. पोलिसांच्या माहितीनुसार, धर्मांतराशी संबंधित काही कागदपत्रांचे धागेदोरे मालेगावशी जोडलेले आहेत. आरोपीने पीडितेचे नाव बदलून ‘हानिया’ ठेवले होते. तसेच तिला मलेशियाला पाठवण्याची योजना असल्याचेही तपासात समोर आले आहे.(Nida Khan CDR report)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक