मुंबई : (Maharashtra Legislative Council election) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधानपरिषदेवर जाणार का? हा प्रश्न आता निकाली लागला आहे. उबाठा गटातर्फे उद्धव ठाकरे यांच्याऐवजी अंबादास दानवे यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, आता काँग्रेस आपला स्वतंत्र उमेदवार देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दोन दिवसांपूर्वी दै. मुंबई तरूण भारतने 'उद्धव ठाकरे विधानपरिषद न लढवण्यावर ठाम; इच्छुकांची भाऊगर्दी' ही बातमी प्रकाशित केली होती. यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या ९ जागांपैकी एक जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला आली असून ही जागा उद्धव ठाकरेंनीच लढवावी, यासाठी मविआतील नेते आग्रही होते. तसेच ठाकरे उमेदवार असतील तर, ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. (Maharashtra Legislative Council election)
मात्र, उबाठा गटातर्फे उद्धव ठाकरेंऐवजी दुसऱ्या कुणाला उमेदवारी मिळाल्यास काँग्रेस या जागेवर लढण्यास इच्छूक होता. उबाठा गटाने धक्कातंत्राचा अवलंब करत अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे काँग्रेसला ही उमेदवारी मान्य आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. (Maharashtra Legislative Council election)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....