Sunil Tatkare : ज्या प्रदेशात राहू तिथली भाषा आपलीशी करावी - सुनील तटकरे
28-Apr-2026
Total Views |
मुंबई : (Sunil Tatkare) "देशातील कोणत्याही प्रदेशात आपण गेल्यानंतर त्या प्रदेशाची संस्कृती आणि भाषा आपण आपलीशी करून घ्यायला हवी, विविधतेत एकता हे एक आपल्या देशाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. स्थानिक भाषा आणि संस्कृती आत्मसात केल्याशिवाय हे वैशिष्ट्य टिकून राहणार नाही. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. इथे येणाऱ्या प्रत्येकाने इथल्या संस्कृतीचा आणि भाषेचा आदर केलाच पाहिजे. रिक्षा-टॅक्सीचालक हा प्रवाशांशी थेट जोडलेला असतो, त्यामुळे त्याला मराठी येणे हे प्रवाशांच्या सोयीचेही आहे. यासंदर्भात टप्प्याटप्प्याने मराठीच्या सक्तीची अंमलबजावणी करायला हरकत नाही.
दुसऱ्या बाजूला मराठी प्रवाशांनीही प्रवास करताना जाणीवपूर्वक मराठी भाषेचा वापर करावा." असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare)यांनी आपल्या एक्स हँडलवरून सोमवार दि.२७ रोजी केले आहे.(Sunil Tatkare)
मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करताना बन यांनी स्पष्ट केले की, "महाराष्ट्रात राहण्यासाठी मराठी येणे आवश्यक आहे. मात्र तिच्या नावाखाली होणाऱ्या हिंसाचाराला समर्थन दिले जाणार नाही."(Sunil Tatkare)
" ज्या राज्यात आपण राहतो ती भाषा आलीच पाहिजे.मुस्लीम समाजाने आपल्या मुलांना मराठी शिकवावे.इथे स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतील इथे नोकरी करायची असेल तर मराठी आली पाहिजे.याकडे कोणत्याही धर्माच्या नजरेतून पाहू नये.पण आठ दिवसात मराठी आली पाहिजे नाहीतर आम्ही गुंडगिरी सुरू करू असे होऊ शकत नाही." असे वक्तव्य एम आय एम चे इम्तियाज जलील यांनी केले आहे.(Sunil Tatkare)
रविवार दि.२६ रोजी मंत्री नितेश राणे म्हणाले ,"मुस्लिम चालकांनी देखील मराठी बोलावे.फक्त हिंदू चालकांना कुणीही लक्ष न करता सर्वांना याबाबत सारखे नियम लावावेत."(Sunil Tatkare)