Android Update : व्हॉट्सॲप युझर्ससाठी महत्वाचा इशारा! तुम्हालाही हा अलर्ट आला नाही ना? आजच ‘ही’ गोष्ट तपासा!
28-Apr-2026
Total Views |
मुंबई : (Android Update) सप्टेंबर २०२६ पर्यंत तुम्ही तुमच्या फोन्सची आवृत्ती बदलली नाही तर WhatsApp तुमच्या फोनमधून हद्दपार होऊ शकते, असा अहवाल कंपनीने दिला आहे. जगातील लोकप्रिय मेसेजिंग ॲप लवकरच काही Android फोन्समधून काम करणे बंद करू शकते. एका अहवालानुसार, सप्टेंबर २०२६ पर्यंत WhatsApp सपोर्ट करू शकणार नाहीत. Android 5.0 आणि Android 5.1 या ऑपरेटींग सिस्टीमवर सुरू असलेल्या मोबाईल फोन्समध्ये आता WhatsApp चालणार नाही. कंपनी आपली नियमावली बदलू इच्छित आहे, त्यामुळे नव्या नियमांनुसार, आता Android 6.0 आणि त्यावरील वर्जन असलेल्या फोन्समध्येच WhatsApp चालणार आहे.(Android Update)
कंपनीच्या मते, WhatsAppवर आता नवे फिचर्स उपलब्ध होणार आहेत. जुन्या (ऑपरेटींग सिस्टीमवर) OS ते चालविणे आता शक्य नाहीत. त्यामुळे नवे अपडेट गरजेचे आहे. WhatsApp आता नोटीफिकेशन बबल्सवर काम करत आहे. ज्यात चॅट स्क्रिनवर फ्लोटींग आयकॉन दिसणार आहेत. जुन्या फोन्सवर हे फिचर काम करू शकणार नाही. त्यामुळे जुन्या ओएसची WhatsApp सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.(Android Update)
याचा फटका भारतातील काही युझर्सना बसू शकतो. जे लोक अद्यापही जुने स्मार्टफोन्स वापरत आहेत, त्यांना सप्टेंबर महिन्यानंतर WhatsApp वापरण्यास अडचणी येऊ शकतात. त्यासहीत ब्राझील, पाकिस्तान, दक्षिण पूर्व आशिया आणि आफ्रिकेतील काही मोबाईल युझर्सचाही सामावेश आहे. (Android Update)
सप्टेंबरपर्यंत येणार अलर्ट
WhatsAppने आता ग्राहकांना अलर्ट पाठविण्यास सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यात सप्टेंबर २०२६नंतर काही दिवसांनी Android सपोर्ट बंद होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यापूर्वी कंपनीने योग्य ती पावले उचलण्याची मागणी केली आहे.
आधीच बॅकअप घ्या!
तुम्हालाही जर अशा प्रकारचा व्हॉट्सअप अलर्ट आला असेल तर गुगल ड्राईव्हवर आपले महत्वाचे डॉक्यूमेंट्स, फोटोज् आणि चॅट्सचा बॅकअप घेऊन ठेवा. ज्यानंतर तुम्ही तुमचा स्मार्टफोन अपडेट केल्यास तुम्हाला विनाअडथळा ते वापरता येऊ शकतील. तूर्त हा अपडेट फक्त Android वापरकर्त्यांसाठी आहे. Apple किंवा iPad युझर्ससाठी कुठल्याही प्रकारचा अपडेट नाही.(Android Update)