मुंबई : (Mahavikas Aghadi) विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी होणाऱ्या निवडणूकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या वाट्याला येणारी एक जागा न लढवण्यावर उद्धव ठाकरे ठाम असून मविआच्या नेत्यांकडून त्यांची मनधरणी सुरु असल्याचे समजते.
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष मिळून विधानपरिषदेची केवळ एक जागा निवडून येण्याइतके संख्याबळ त्यांच्याकडे आहे. त्यात उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर, ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधानपरिषदेवर जाणार का? याबाबत त्यांनी अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. शिवाय ठाकरे ही निवडणूक लढवणार नसल्यास उबाठा गटाचे अंबादास दानवे, सुषमा अंधारे, विनायक राऊत, वैभव नाईक, सूरज चव्हाण यांच्यासह अनेक नेते रांगेत असल्याचे समजते.(Mahavikas Aghadi)
दुसरीकडे, उद्धव ठाकरे विधानपरिषद निवडणूक लढवणार नसतील तर ही एक जागा आपल्या वाट्याला यावी, यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असल्याचेही सांगण्यात येते. त्यामुळे मविआत एकमत न झाल्यास या निवडणुकीचे चित्र बदलण्याची शक्यता आहे.(Mahavikas Aghadi)
विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी येत्या १२ मे रोजी मतदान होणार असून ३० एप्रिल हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त तीन दिवस शिल्लक असताना अद्याप कोणत्याही पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले नाहीत. विधानसभेतील आमदारांचे संख्याबळ पाहता भाजप ५, शिवसेना २ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एक जागा येते. तर, महाविकास आघाडीची केवळ एक जागा निवडून येऊ शकते.(Mahavikas Aghadi)
शिवसेना १० वा उमेदवार देणार?
विधानपरिषदेच्या निवडणुकीत एका आमदाराच्या विजयासाठी २९ मतांचा कोटा आवश्यक आहे. विधानसभेत शिवसेनेचे ५७ इतके संख्याबळ असून त्यांच्या दोन जागा सहज निवडून येऊ शकतात. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने या निवडणूकीत दहावा उमेदवार देण्यात येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत.(Mahavikas Aghadi)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....