Chhagan bhujbal : उष्णतेत जनतेने स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी- छगन भुजबळ

    27-Apr-2026
Total Views |
chagan bhujbal
 
मुंबई : (Chhagan bhujbal) "राज्यामध्ये सध्या उष्णतेची लाट आल्याने उकाडा हा मोठ्या प्रमाणावर वाढला असून तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा धोका वाढला असून उष्माघातामुळे मृत्यू होण्याच्या दुर्दैवी घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व शेतकरी, कामगार बांधव आणि जनतेने स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी."असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा ,ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या एक्स हँडलवरून सोमवार दि.२७ रोजी केले आहे.(Chhagan bhujbal)
 
हेही वाचा :  Maharashtra Heatwave: महाराष्ट्रात उष्णतेचा कहर! अकोल्यात ४५°C, तर बुलढाण्यात ६८ वर्षांचा विक्रम मोडला! कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
 
"वाढत्या उन्हाचा तडाखा लक्षात घेता ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि आजारी व्यक्तींनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. दुपारच्या वेळी, विशेषतः सकाळी ११ ते दुपारी ४ या काळात घराबाहेर पडणे टाळावे. बाहेर जाणे अनिवार्य असल्यास सुती कपडे, टोपी, छत्री आणि चष्मा यांचा वापर करावा. उन्हातून आल्यावर चक्कर येणे, मळमळणे किंवा तीव्र डोकेदुखी जाणवल्यास त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावा. उष्माघातापासून बचावाच्या सूचनांचे पालन करून स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करावा." असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.(Chhagan bhujbal)