मुंबई : (Lift Irrigation Hydropower Project) राज्याच्या ऊर्जा क्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने जलसंपदा विभाग आणि तात्यासाहेब कोरे वारणा नवशक्ती निर्माण संस्था यांच्यात सुमारे ५,२०० कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘वर्षा’ निवासस्थानी हा करार झाला.
या करारांतर्गत कोल्हापूर-सिंधुदुर्ग आणि शाहूवाडी येथे तीन उदंचन (पंप्ड स्टोरेज) जलविद्युत प्रकल्प उभारले जाणार असून एकूण ११०० मेगावॅट वीज निर्मिती क्षमता निर्माण होणार आहे. यामुळे सुमारे ११०० रोजगार निर्माण होणार आहेत.(Lift Irrigation Hydropower Project)
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, या प्रकल्पांमुळे कमी खर्चात ऊर्जा साठवणूक होऊन राष्ट्रीय ग्रीड स्थिर ठेवण्यास मदत होईल. राज्याने उदंचन प्रकल्पांमध्ये(Lift Irrigation Hydropower Project)
८० हजार मेगावॅटपेक्षा अधिक क्षमतेचा टप्पा गाठला असून भविष्यातील वाढत्या वीज मागणीसाठी हे प्रकल्प महत्त्वाचे ठरणार आहेत.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, या प्रकल्पांमुळे प्रदूषणमुक्त आणि शाश्वत वीज निर्मितीला चालना मिळेल व २४ तास वीजपुरवठा सुनिश्चित होण्यास मदत होईल. या प्रकल्पांना ‘अँकर प्रोजेक्ट’ म्हणून सहकार्य देण्याचा राज्य सरकारचा विचार असून वीज खरेदी करार (PPA) व वित्तीय सहाय्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली जाणार आहे.(Lift Irrigation Hydropower Project)
आतापर्यंत एकूण ५९ प्रकल्पांद्वारे ८१,२१५ मे.वॅ. वीज निर्मिती अपेक्षित आहे. त्यामुळे रु. ४.२८ लक्ष कोटी इतकी गुंतवणूक तर १.३१ लक्ष मनुष्यबळ रोजगार निर्मिती होणार आहे. वरील योजनांसाठी प्राप्त प्रस्तावांनुसार प्रथम पाणीसाठ्याकरिता अंदाजे १९.२९ टीएमसी इतके पाणी आवश्यक असून प्रतिवर्षी पुर्नभरणासाठी ३.२४ टीएमसी पाणी आवश्यक आहे. उदंचन योजनांच्या पाण्यापोटी प्रथम भरणासाठी औद्योगिक दराने सुमारे १ ७६२.२१ कोटी व प्रतिवर्ष पुनर्भरणासाठी सुमारे ₹१२८.३२ कोटी महसूल मिळणे अपेक्षित आहे.(Lift Irrigation Hydropower Project)
उदंचन जलविद्युत प्रकल्पाचे नाव व तपशील
1. कुंभी ऑफ स्ट्रीम क्लोज्ड लूप उदंचन प्रकल्प, जि. कोल्हापूर / सिंधुदुर्ग (भाग-अ)
स्थापित क्षमता (मे.वॅ) - 600
गुंतवणूक (रु.कोटी) - 2784
रोजगार निर्मिती - 600
2. कुंभी ऑफ स्ट्रीम क्लोज्ड लूप उदंचन प्रकल्प, जि. कोल्हापूर / सिंधुदुर्ग (भाग-ब)
स्थापित क्षमता (मे.वॅ) - 300
गुंतवणूक (रु.कोटी) - 1434
रोजगार निर्मिती - 300
3. कडवी ऑफ स्ट्रीम क्लोज्ड लूप उदंचन प्रकल्प, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.