मुंबई : (Hindu sammelan) भारतभर सुरू असलेल्या हिंदू संमेलनांचा एक भाग म्हणून गोरेगावातील पांडुरंगवाडी–गोगटेवाडी–नाईकवाडी विभागाचे हिंदू संमेलन नुकतेच मसुराश्रमाच्या प्रांगणात उत्साहात पार पडले. शंखध्वनीच्या गजरात भारतमाता पूजन व दीपप्रज्वलनाने सायंकाळी ४ वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली.
या संमेलनात (Hindu sammelan) निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. तसेच ९ एप्रिल २०२६ रोजी शताब्दी वर्षात पदार्पण करणारे संघतपस्वी-विज्ञानमहर्षी सदाशिव तथा भाऊराव काळे यांच्यासह स्थानिक तीन महिला व सहा पुरुष अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. स्वदेशी जागरण मंचाचे प्रशांत देशपांडे यांनी प्रमुख उद्बोधन केले. सुमारे २०० नागरिकांच्या उपस्थितीत सायंकाळी ७:४५ वाजेपर्यंत कार्यक्रम पार पडला. (Hindu sammelan)
मसुराश्रमाचे अध्यक्ष व आमदार अतुल भातखळकर यांनीही काही काळ उपस्थित राहून भाऊराव काळे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी उपस्थितांनी उभे राहून १०० टाळ्यांच्या गजरात त्यांना मानवंदना दिली. (Hindu sammelan)
कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचाही गौरव करण्यात आला. मध्यप्रदेश संस्कृती विभागाचा प्रतिष्ठित 'तानसेन पुरस्कार' प्राप्त पंडित राजा काळे, आयआयटी मुंबईतून ५९ व्या वर्षी पीएचडी पूर्ण करणारे डॉ. शरद प्रभु, केईएम–सायन रुग्णालयाचे डीन व प्रसिद्ध हृदय शल्यविशारद डॉ. अनिल तेंडुलकर, कोरोना काळात अखंड सेवा देणारे व आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविलेले डॉ. परमार, तसेच आंतरराष्ट्रीय प्रेरणादायी वक्ते डॉ. रत्नाकर अहिरे यांचा सन्मान करण्यात आला. महिलांमध्ये सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या सौ. विद्या नारायण वाडदेकर, ह.भ.प. सौ. मीराताई नंदकुमार रोपळेकर आणि गीर्वाणभारतीच्या श्रीमती संयुक्ता कैकिणी यांचा गौरव करण्यात आला. (Hindu sammelan)
या संमेलनाचे विशेष आकर्षण ठरली ती निबंध स्पर्धा. दोन गटांत विभागलेल्या या स्पर्धेत १८ ते २५ वयोगटासाठी 'मला समजलेला हिंदू धर्म' आणि 'सोशल मीडियाचा तरुण पिढीवर परिणाम' हे विषय देण्यात आले होते. तर २६ ते ९० वयोगटासाठी '२०४७ - संविधान की शरिया?' आणि 'हिंदू देवालये आणि आमची उपस्थिती' हे विषय ठेवण्यात आले होते. (Hindu sammelan)
सद्यस्थितीतील विविध सामाजिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हिंदू समाजाचे अंतर्मन जागृत करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्राप्त निबंधांच्या परीक्षणातून समान नागरी कायद्याची आवश्यकता अधोरेखित झाली, तसेच मंदिरे ही व्यक्तिमत्व विकासाची केंद्रे व्हावीत, असा विचारही पुढे आला. 'संविधान आणि हिंदू धर्म हे परस्परविरोधी नसून दोन्ही समानता, विवेक आणि मानवी प्रतिष्ठेचा पुरस्कार करतात,' हा महत्त्वपूर्ण संदेशही निबंधांतून उमटला.
स्वदेशी जागरण मंचाचे प्रशांत देशपांडे यांनी 'पंच परिवर्तन' या विषयावर सुमारे पाऊण तास प्रभावी मार्गदर्शन केले. सोप्या आणि ओघवत्या भाषेत त्यांनी समाजपरिवर्तनाची दिशा स्पष्ट केली. 'हिंदू एकता मंच' आयोजित या संमेलनातून समाजजागृती, एकात्मता आणि आत्मपरीक्षणाचा संदेश देण्यात यश आले, अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली. (Hindu sammelan)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक