Water supply : मुंबईत काही भागांत गुरुवारी पाणीपुरवठा बंद; शिवडीत बटरफ्लाय व्हॉल्व बसविणार
21-Apr-2026
Total Views |
मुंबई : (Water supply) बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे शिवडी येथील टनल-भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवर हाजीबंदर मार्ग येथे दोन १५०० मिमी व्यासाचे बटरफ्लाय व्हॉल्व बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. भंडारवाडा, फॉसबेरी आणि गोलंजी टेकडी जलाशयांचा पाणीपुरवठा अधिक सुव्यवस्थित करण्यासाठी हे काम बुधवार, २२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते गुरुवार, २३ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत चालणार आहे.
या १८ तासांच्या कामामुळे ए, बी, सी, ई आणि एफ दक्षिण विभागातील काही भागांत पाणीपुरवठा (Water supply) पूर्णपणे बंद, तर काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. प्रभावित भागांमध्ये पी. डी’मेलो मार्ग, उमरखाडी, नागपाडा, मदनपुरा, माझगाव, काळाचौकी, शिवडी, वडाळा, लालबाग, दादर, परळ यांसह अनेक परिसरांचा समावेश आहे. काही रुग्णालयांनाही कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.(Water supply)
महापालिकेने नागरिकांना आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवण्याचे, पाणी जपून वापरण्याचे आणि पुढील ४ ते ५ दिवस पाणी उकळून-गाळून पिण्याचे आवाहन केले आहे.(Water supply)