Vishu Ad Controversy in Kerala : 'विषू जाहिरात' वादाला नवे वळण; विहिंपकडून पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह

कार्यकर्त्यांवर नोंदवलेले खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी

    20-Apr-2026   
Total Views |
Vishu Ad Controversy in Kerala
 
मुंबई : (Vishu Ad Controversy in Kerala) विश्व हिंदू परिषदेचे केरळ राज्य महामंत्री अनिल विलायल यांनी चेर्थला येथील पोलीस ठाण्यात नोंदवलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी केली आहे. हे गुन्हे त्या लोकांविरुद्ध दाखल करण्यात आले होते, ज्यांनी मेहेर मंडी अँड ग्रिल्स या आस्थापनाने तयार करून वितरित केलेल्या विषू शुभेच्छापत्राला आक्षेप घेत प्रतिक्रिया दिली होती. या शुभेच्छापत्रात भगवान कृष्णाचे वादग्रस्त चित्रण करण्यात आल्याचा आरोप आहे. हे आस्थापन मोहम्मद शेमीर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे असल्याचे सांगितले जाते. विलयिल यांच्या मते, अशा प्रकारचे गुन्हे दाखल करणे हे पिनराई विजयन यांच्या सरकारच्या त्या धोरणाचा भाग आहे, ज्यामध्ये गुन्हे करणाऱ्यांचे संरक्षण केले जाते आणि ते उघड करणाऱ्यांवर कारवाई केली जाते.(Vishu Ad Controversy in Kerala)
 
पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या लोकांच्या घरात घुसून कारवाई केल्याचा आरोप करत, ही कारवाई अस्वीकार्य असल्याचे अनिल विलायल यांनी म्हटले. या प्रकरणात आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत आणि जप्त केलेले मोबाईल फोन तातडीने परत करावेत, अशी त्यांनी मागणी केली. चेरथळा येथील घडामोडींचा संदर्भ देताना ते म्हणाले, मेहेर मंडी अँड ग्रिल्स प्रकरण एकटे नाही. केरळमधील विविध ठिकाणी भगवान कृष्णांचे आक्षेपार्ह चित्रण असलेली विषू शुभेच्छा दिसल्याचे त्यांनी सांगितले. अशा सुमारे आठ ठिकाणी ही प्रकरणे आढळली असल्याचा दावा त्यांनी केला.(Vishu Ad Controversy in Kerala)
 
हेही वाचा : Milind Parande : हिंदू समाजाला जिहादी डावपेच आणि धर्मांतरणापासून मुक्त करूनच राहू!
 
त्यांच्या मते, या घटना सतत चाचपणी करण्याचा आणि प्रतिक्रिया भडकावण्याचा एक ठराविक नमुना दर्शवतात. विश्व हिंदू परिषदेसह हिंदू संघटनांनी या जाहिराती विरोधात तीव्र प्रतिक्रिया दिली असून, चेरथळा पोलिसांच्या कारवाईमुळे परिस्थिती आणखी चिघळल्याचा आरोप त्यांनी केला. हा विषय कायदेशीर आणि सार्वजनिक स्तरावर ठामपणे पुढे नेला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.(Vishu Ad Controversy in Kerala)
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक