मुंबई : (Dr. Mohanji Bhagwat) संस्कृत केवळ भाषा नसून भारताच्या संस्कृती, परंपरा आणि जीवनदृष्टीचा आधारस्तंभ आहे. भारताला समजून घेण्यासाठी संस्कृत समजणे अत्यावश्यक आहे, कारण आपल्या ज्ञानपरंपरा, तत्त्वज्ञान आणि जीवनमूल्ये याच भाषेत निहित आहेत. संस्कृत हा भारताचा आत्मा आणि वैश्विक वारसा आहे आणि हा ज्ञानसंचय संपूर्ण जगाला देण्याची आवश्यकता आहे", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.(Dr. Mohanji Bhagwat)
अक्षय तृतीयेच्या निमित्ताने संस्कृतच्या पुनरुत्थान आणि जागतिक प्रसारासाठी कार्यरत असलेल्या संस्कृत भारतीच्या ‘प्रणव’ या नव्या केंद्रीय कार्यालयाचे भव्य लोकार्पण सोमवारी सकाळी ७.१५ वाजता दिल्लीत पार पडले. दिल्लीतील या अत्याधुनिक इमारतीचे लोकार्पण सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते वैदिक विधीपूर्वक करण्यात आले. लोकार्पणापूर्वी त्यांनी ‘गावो विश्वस्य मातरः’ या भावनेतून गोमातेची पूजा केली आणि शतचंडी यज्ञात पूर्णाहुती दिली. आचार्य सुधीर वेदपाठी, प्रो. रामराज उपाध्याय आणि प्रो. परमानंद भारद्वाज यांच्या उपस्थितीत संपूर्ण विधी पार पडला. त्यानंतर ‘प्रणव’ भवनाचे लोकार्पण करून डॉ. भागवत यांनी इमारतीची पाहणी केली.(Dr. Mohanji Bhagwat)
उपस्थितांना संबोधत सरसंघचालक म्हणाले, संस्कृत ही सर्व भारतीय भाषांना जोडणारी कडी आहे आणि तिच्या माध्यमातून इतर भाषा सहज शिकता येतात. संस्कृतमधील ज्ञान-विज्ञानाचा विशाल साठा संपूर्ण मानवजातीसाठी उपयुक्त आहे. कोणतेही कार्य करताना केवळ आवड पुरेशी नसते, तर त्यामागील उद्देशाची स्पष्टता, संयम आणि सातत्य आवश्यक असते. जसे श्वासोच्छ्वास अखंड सुरू असतो, तसेच संस्कृत कार्यही न थकता सतत चालू ठेवले पाहिजे.(Dr. Mohanji Bhagwat)
संस्कृत शिकण्यासाठी ‘संभाषण पद्धती’ सर्वात सोपी आणि प्रभावी असल्याचे त्यांनी नमूद केले. व्यवहारात वापर करून, बोलचालीतून संस्कृत सहज शिकता येते. संस्कृत संभाषण शिबिरे या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असून अल्पावधीत भाषेचे ज्ञान प्राप्त होऊ शकते. संस्कृतला पुन्हा गौरव प्राप्त करून द्यायचा असेल, तर ती लोकभाषा बनवणे आवश्यक आहे. संस्कृतभारतीचे कार्य सर्व भाषांना सोबत घेऊन चालण्याचे असून, संस्कृतमुळे इतर भारतीय भाषा अधिक समृद्ध होतील आणि सांस्कृतिक एकात्मतेची भावना दृढ होईल, असेही सरसंघचालकांनी सांगितले.(Dr. Mohanji Bhagwat)
संस्कृत भारतीचे अखिल भारतीय संघटन मंत्री जयप्रकाश गौतम यावेळी सांगितले की, संस्कृतभारतीची स्थापना १९८१ मध्ये संस्कृतला बोलीभाषा बनवण्याच्या उद्देशाने झाली. पुढे हा उपक्रम व्यापक आंदोलनात परिवर्तित झाला आणि १९९५ मध्ये ‘संस्कृतभारती’ हे नाव प्राप्त झाले. आज हे कार्य २८ देशांमध्ये आणि भारतातील ६६० जिल्ह्यांमध्ये विस्तारले आहे. ‘प्रणव’ भवन सुमारे ५०,००० चौरस फूट क्षेत्रावर उभारले असून आधुनिक सुविधा आणि प्राचीन परंपरेचा सुंदर संगम आहे. देशातील १०% लोकसंख्येपर्यंत संस्कृत पोहोचवणे आणि १२ भाषांच्या माध्यमातून शिक्षण देणे हे याचे उद्दिष्ट आहे. येथे वास्तुशास्त्र, शिल्पशास्त्र, वनस्पतिशास्त्र आणि धर्मशास्त्र यांसारख्या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध राहणार आहे.(Dr. Mohanji Bhagwat)
पंतप्रधानांचा संदेश : संस्कृत भविष्याचीही भाषा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात सांगितले की, अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ‘प्रणव’ कार्यालयाचे लोकार्पण होणे अत्यंत आनंददायी आहे. भारतीय ज्ञानपरंपरा, संस्कृती आणि आध्यात्मिक चेतनेच्या पुनरुज्जीवनासाठी हे एक प्रेरणादायी पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले. संस्कृत ही आपल्या समृद्ध वारशाची वाहक असून त्यातील ज्ञान-विज्ञान आणि तत्त्वज्ञान मानवतेसाठी अमूल्य ठेवा आहे. नव्या शिक्षण धोरणातून भारतीय भाषा आणि ज्ञानपरंपरेला प्राधान्य दिल्याने संस्कृतला नवी दिशा मिळाली आहे. संस्कृत ही केवळ भूतकाळाची नव्हे तर वर्तमान आणि भविष्याचीही प्रभावी भाषा असल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांचा संदेश सचिन कठाले यांनी वाचून दाखवला. तसेच शारदा पीठ, श्रृंगेरी येथील जगद्गुरू शंकराचार्य विधुशेखरभारती यांचा संदेशही यावेळी वाचण्यात आला.(Dr. Mohanji Bhagwat)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक