Mumbai Illegal Schools Allegations : ‘स्कूल जिहाद’ प्रकरणाने मुंबईत खळबळ

मुंबईतील १५२ शाळा माफियांच्या ताब्यात? सोमय्यांचा दावा

    20-Apr-2026   
Total Views |
Mumbai Illegal Schools Allegations
 
मुंबई : (Mumbai Illegal Schools Allegations) भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईतील ‘स्कूल जिहाद’ व ‘लँड जिहाद’ संदर्भात गंभीर आरोप केले आहेत. शहरात १६४ शाळा पूर्णपणे बेकायदेशीररीत्या चालविल्या जात असून त्यापैकी १५२ शाळा मुस्लिम लँड माफियांच्या ताब्यात असल्याचा दावा सोमय्यांनी केलाय. मुंबईत यापूर्वी ‘कॉर्पोरेट जिहाद’, ‘लँड जिहाद’, ‘कोचिंग क्लासेस जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’ सुरू होते, आता त्यात ‘स्कूल जिहाद’ या नव्या प्रकाराची भर पडल्याचेही त्यांनी म्हटले. आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.(Mumbai Illegal Schools Allegations)
 
सोमय्यांनी आरोप केलाय की, या बेकायदेशीर शाळा मुख्यतः गोवंडी, मलाड आणि कुर्ला या भागांत मोठ्या प्रमाणावर आढळतात. या भागांना ‘मिनी बांग्लादेश’ असे संबोधले जात असल्याचेही त्यांनी म्हटले. रविवारी त्यांनी स्वतः १२ शाळांचे प्रत्यक्ष पाहणी केल्याचा दावा केला असून, काही ठिकाणी धर्मस्थळे व हिंदू मंदिरांच्या जागेवरही बेकायदेशीर बांधकाम आढळल्याचे त्यांनी सांगितले.(Mumbai Illegal Schools Allegations)
 
पुढे ते म्हणाले की, हे माफिया सरकारी जमीन बळकावत असून मुलांच्या भविष्याशी खेळ करत आहेत. येत्या दोन आठवड्यांत या बेकायदेशीर शाळांवर कारवाई सुरू होईल आणि संबंधित माफियांवर पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाईल. कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून मुलींना जाळ्यात ओढण्याच्या कटाचाही उल्लेख करत सदर प्रकरणाचा तपास करणारी एसआयटी हळूहळू सत्य बाहेर आणत असल्याचे त्यांनी सांगितले. पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देणे आणि त्यांना आधार देणे हे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले.(Mumbai Illegal Schools Allegations)
 
शेवटी, त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला तातडीने बेकायदेशीर शाळा बंद करण्याची आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. त्यांच्या मते, या शाळा केवळ बेकायदेशीर नाहीत, तर शहरातील जमीन बळकावण्याचे आणि सांप्रदायिक अजेंडा पुढे नेण्याचे माध्यम बनत आहेत.(Mumbai Illegal Schools Allegations)
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक