मुंबई : (Surat Lenskart Case) गुजरातमधील सूरत येथील वेसू परिसरात राहणाऱ्या हिंदू युवक जील सोगासिया यांनी लेंसकार्ट कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, हिंदू धार्मिक चिन्हे जसे की तिलक आणि शिखा (शेंडी) काढण्यास नकार दिल्यामुळे त्यांना कंपनीचा प्रशिक्षण कार्यक्रम सोडावा लागला. हा प्रकार अशा वेळी समोर आला आहे, जेव्हा नुकत्याच कंपनीच्या अंतर्गत ‘ग्रूमिंग पॉलिसी’ संदर्भात वाद निर्माण झाला होता.(Surat Lenskart Case)
जील सोगासिया यांच्या मते, त्यांना नोकरीसाठी कॉल आला होता आणि त्यांनी सूरतमधील वेसू येथे मुलाखत दिली होती. मुलाखतीदरम्यान धार्मिक पोशाख किंवा चिन्हांबाबत कोणतीही अट सांगितली गेली नव्हती. मात्र, ते व्यावसायिक प्रशिक्षणासाठी नवी मुंबई येथे गेल्यानंतर परिस्थिती बदलली. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रशिक्षण केंद्रात दुसऱ्याच दिवशी व्यवस्थापनाने त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर आक्षेप घेत अल्टिमेटम दिला. शिखा (शेंडी) कापणे, तिलक काढणे तसेच हातावरील धार्मिक टॅटू हटवण्यास सांगण्यात आल्याचा त्यांनी आरोप केला आहे.(Surat Lenskart Case)
सोगासिया यांचा दावा आहे की, धार्मिक ओळखीची ही चिन्हे न काढल्यास कंपनीत नोकरी दिली जाणार नाही, असे स्पष्टपणे सांगण्यात आले. आपल्या धार्मिक श्रद्धांशी तडजोड करण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी अखेर प्रशिक्षण केंद्र सोडले. मात्र, ही घटना नेमकी कधी घडली याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. तसेच, या प्रकरणाबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.(Surat Lenskart Case)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक