Chandrashekhar Bawankule : काँग्रेसने लाडक्या बहिणींचा विश्वासघात केला, महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

    20-Apr-2026
Total Views |
Chandrashekhar Bawankule
 
नागपूर : (Chandrashekhar Bawankule) राज्यात संभाव्य दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने व्यापक उपाययोजना आखण्यास सुरुवात केली असून संपूर्ण प्रशासन सतर्क ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला.
 
यापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्व पालकमंत्र्यांना अल निनोच्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. राज्यातील संभाव्य दुष्काळ परिस्थितीवर शासनाची भूमिका आणि उपाययोजना यावर लवकरच सविस्तर बैठक होणार असून त्यात विविध बाबींचा आढावा घेतला जाणार आहे.महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. “लाडक्या बहिणींचा विश्वासघात काँग्रेसने केला असून या वृत्तीचा जनता बदला घेईल,” असे ते म्हणाले.(Chandrashekhar Bawankule)
 
हेही वाचा : CM Devendra Fadnavis : १७ एप्रिल रोजी भारतातल्या समाज सुधारकांच्या विचारांवर विरोधकांनी तांडव केलं - देवेंद्र फडणवीस
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना संसदेत मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध करून दिली असताना अनुसूचित जाती, ओबीसी आणि इतर घटकांतील महिलांना पुढे येण्यापासून रोखण्याचे काम काँग्रेसने केल्याचा आरोप त्यांनी केला. यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी मुली बेपत्ता प्रकरणाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, या संदर्भातील माहिती गृह खात्याकडे असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले आहे. विदर्भातील हा गंभीर प्रश्न असल्याने आपणही लक्ष ठेवणार असून आदिवासी मंत्री अशोक ऊईके यांच्याकडूनही या प्रकरणावर देखरेख ठेवली जात आहे.(Chandrashekhar Bawankule)
 
नागपूरमधील रियाज काजी धर्मांतरण प्रकरणाबाबत त्यांनी सांगितले की, पोलिसांनी या गंभीर प्रकरणात कठोर कारवाई केली असून मोठा परिणाम होऊ शकणारी ही बाब वेळेत रोखण्यात यश आले आहे.(Chandrashekhar Bawankule)
 
दरम्यान, परतवाडा प्रकरणाबाबत “पूर्ण अधिकृत माहिती बाहेर येईपर्यंत कोणत्याही प्रकारचे आरोप-प्रत्यारोप टाळावेत. अशा संवेदनशील प्रकरणांमुळे दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होऊन अमरावतीचे वातावरण बिघडू नये, याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी मातंग समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.(Chandrashekhar Bawankule)