मुंबई : (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मान्सूनपूर्व देखभालीच्या कामासाठी गुरुवार, दि. ७ मे रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत प्राथमिक रनवे ०९/२७ आणि दुय्यम रनवे १४/३२ तात्पुरते बंद राहतील.(Chhatrapati Shivaji Maharaj International Airport)
सीएसएमआयएच्या सर्वसमावेशक मान्सून आपत्कालीन नियोजनाचा भाग म्हणून, विमान कंपन्या आणि इतर भागधारकांना वेळेआधी सूचना देण्यासाठी सहा महिन्यांपूर्वीच सल्लामसलत प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यामुळे विमान कंपन्यांना त्यांच्या उड्डाण वेळापत्रकात आवश्यक ते बदल आगाऊ करता आले आहेत, अशी माहिती विमानतळ प्रशासनाने जारी केलेल्या निवेदनात सांगितले आहे.(Chhatrapati Shivaji Maharaj International Airport)
ही वार्षिक प्री-मान्सून देखभाल विमानतळाच्या सुमारे 1,033 एकर क्षेत्रातील एअरसाइड पायाभूत सुविधांची स्थिती चांगली ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तज्ञ रनवेच्या पृष्ठभागावरील झीज-झडती तपासतील आणि मान्सून काळात सुरक्षित लँडिंग व टेक-ऑफ सुनिश्चित करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करतील. तसेच, आधुनिक यंत्रसामग्री आणि सखोल नियोजनाच्या मदतीने संपूर्ण देखभाल प्रक्रिया ठरलेल्या सहा तासांच्या वेळेत पूर्ण केली जाईल.(Chhatrapati Shivaji Maharaj International Airport)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.