मुंबई : (Ashok Kharat case) भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दोषींवर कारवाई अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच या प्रकरणात नाव समोर आलेल्या रुपाली चाकणकर यांनी पोलिसांच्या चौकशीस पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.(Ashok Kharat case)
राज्यात खळबळ उडवणाऱ्या या प्रकरणात महिलांचे कथित शोषण आणि आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप समोर आले आहेत. अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. तपासादरम्यान त्याच्या निकटवर्तीयांवरही संशय व्यक्त केला जात आहे.(Ashok Kharat case)
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी (सुनेत्रा अजित पवार गट) पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदासह पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पोलिसांनी त्यांना समन्स बजावले असून, चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांच्या अटकेची मागणीही विविध स्तरांतून केली जात आहे.(Ashok Kharat case)
विजया रहाटकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “महाराष्ट्र पोलीस आणि विशेष तपास पथक या प्रकरणाचा निपक्षपाती तपास करत आहेत. दोषींवर योग्य ती कारवाई होईल.” त्यांनी पुढे नमूद केले की, चौकशीसाठी बोलावल्यास संबंधितांनी हजर राहणे आणि तपास यंत्रणेला सहकार्य करणे आवश्यक आहे.(Ashok Kharat case)
दरम्यान, या प्रकरणात रुपाली चाकणकर तसेच त्यांच्या कुटुंबीयांची एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे. खरातच्या कथित आर्थिक व्यवहारांशी त्यांचा संबंध असल्याचे आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहेत. मात्र, चाकणकर यांनी हे आरोप फेटाळून लावत, या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रकरणातील तपास सुरू असून, पुढील कायदेशीर कारवाईकडे राज्याचे लक्ष लागले आहे.(Ashok Kharat case)