कल्याण : (Aatmabodh Vishwabodh Kalyan Event) "स्वर्णीम भारताचे स्वप्न पहाणार्यांनी रॅडीकल इस्लाम, ग्लोबल मार्केटच्या आंतरराष्ट्रीयशक्ती, धर्मांतरण घडवून आणणारे क्रिप्टो ख्रिश्चन मिशनरी, कम्युनिस्ट, नव मार्क्सवादी भारताचे अंतर्गत शत्रू आहेत.त्यांचे मुळ स्वरुप जाणून घेवून सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे" असे प्रतिपादन अखिल भारतीय साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष डाॅ. दिनेश प्रताप सिंग यांनी केले.(Aatmabodh Vishwabodh Kalyan Event)
कल्याण येथे साहित्य भारती कल्याण शाखेने आयोजित केलेल्या 'आत्मबोध ते विश्वबोध' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. रामायण, महाभारत, भगवद्गीता यांतील उदाहरणे देवून ते पुढे म्हणाले "भारतीय अभ्यूदयाच्या मार्गात अडसर असलेल्या या विचारसरणी अध्ययन द्वारे आपल्याला समजतील म्हणून अध्ययन केले पाहीजे. भारतीय विचारधारेवर असलेली ही संकटे दूर करण्यासाठी आत्मबोध आम्हाला मदत करेल. स्व चा भाव, स्वदेशाचा शास्त्रीय, वैज्ञानिक, सामाजिक व पराक्रमाचा इतिहास आम्हाला आम्ही कोण आहोत याचा आत्मबोध आम्हाला करुन देईल. आत्मबोध झालेले आपण मग विश्वबोधाच्या मार्गाकडे वळू." आपल्या भाषणात डाॅ. दिनेश प्रताप सिंग यांनी रॅडीकल इस्लाम, क्रिप्टो ख्रिश्चन, ग्लोबल मार्केट व नव मार्क्सवादाची अनेक उदाहरणे देवून ही संकटे आपल्या घरापर्यंत कशी पोहोचली आहेत हे सांगितले. संघाच्या माध्यमातून या संकटांवर मात करण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न चालू आहेत हे सांगून उपस्थितांना या महायज्ञात सहभागी होण्याचे आवाहन केले. "विश्व कल्याणासाठी भारताने स्वयंतेजाने उभे रहाणे आवश्यक आहे. विश्वाला आपल्या प्रज्ञावान विचारांनी मार्गदर्शन करण्याचे काम नियतीनेच भारतावर सोपविले आहे" असे ते म्हणाले.(Aatmabodh Vishwabodh Kalyan Event)
कार्यक्रमाची सुरवात शारदा पूजनाने झाली तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्य भारती कल्याणचे अध्यक्ष प्रा. नारायण फडके हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव प्रा. दुर्गेश दुबे यांनी केले. सरस्वती वंदना साहित्यिक सत्यभामासिंह, संघटनमंत्र व शांती मंत्र साहित्यिक संजय द्विवेदी, परिषद गीत सुमिता भोसले व पल्लवी रानी, तसेच कार्याध्यक्ष प्राजक्ता कुलकर्णी यांनी आभार मानले. कार्यक्रमास कोकण प्रांत कार्याध्यक्ष प्रवीण देशमुख, महामंत्री डाॅ. शामसुंदर पांडेय, बिर्ला महाविद्यालय नाईट काॅलेजचे प्राचार्य बिपीन वाडेकर, डाॅ. रत्नाकर फाटक, प्रा. दिनानाथ पाटील, साहित्य भारतीचे सभासद व संघाचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्र गीत जनगणमन सामुहिक गाऊन कार्यक्रमाची सांगता झाली.(Aatmabodh Vishwabodh Kalyan Event)