परतवाडा अश्लील व्हिडीओ प्रकरणी एसआयटी स्थापन; आरोपीच्या घरावर बुलडोजर

    15-Apr-2026   
Total Views |
girls exploitation case
 
मुंबई :(Amravati Obscene Video Case) अमरावती जिल्ह्यातील परतवाडा अश्लील व्हिडीओ प्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची घोषणा अमरावती ग्रामीण पोलिस अधिक्षकांनी केली आहे. यात ४७ अनुभवी पोलिस अधिकारी आणि अंमलदारांचा समावेश असेल.
 
या प्रकरणामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली असून आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. मोहम्मद अय्याज मोहम्मद तनवीर असे यातील प्रमुख आरोपीचे नाव आहे. हा आरोपी तरूण मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याचा आरोप आहे. या आरोपीला अटक करण्यात आली असून ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, आता या प्रकरणाच्या (Amravati Obscene Video Case) चौकशीसाठी सहाय्यक पोलिस अधिक्षक डॉ. शुभम कुमार यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी पथक स्थापन करण्यात आले आहे.
 
हेही वाचा :  Amravati Minor Girl Video Leak Case: सोशल मीडियाद्वारे १८० अल्पवयीन मुलींचं शोषण, आरोपी अयान अहमद अटकेत
 
आरोपीच्या घरावर बुलडोजर
 
याप्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीरचे घर अतिक्रमित असून त्याच्या घरावर अचलपूर नगरपरिषदेने बुलडोझर चालवले. तसेच याप्रकरणात बुधवारी अचलपूर आणि परतवाडा शहर बंदची हाक देण्यात आली. या घटनेतील पीडितांनी समोर येऊन माहिती देण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
आरोपी अयाज एमआयएमचा पदाधिकारी?
 
दरम्यान, याप्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद अयाज हा एमआयएमचा पदाधिकारी असल्याचीही माहिती पुढे आली होती. यावर एमआयएमचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद आदिल शेख यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, "अचलपूरच्या नगरपरिषद निवडणूकीदरम्यान, सोशल मीडिया सांभाळण्याची जबाबदारी आमच्या तालुक्याध्यक्षांनी दिली होती. परंतू, निवडणूकीदरम्यान, त्याने पक्षासाठी किंवा पक्षाच्या उमेदवारांसाठी कोणतेही सामाजिक उपक्रम केले नाहीत. त्यामुळे मतदानानंतर त्याला पक्षातून काढून टाकण्यात आले होते. आजही तो आमच्या पक्षाचा पदाधिकारी किंवा कार्यकर्ता नसून एमआयएम पक्षाशी त्याचा काहीही संबंध नाही.(Amravati Obscene Video Case)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....