Navnath Ban : उबाठा गटाची धुरा घेण्यासाठी राऊतांचे प्रयत्न
नवनाथ बन; पक्षप्रमुख होण्याची राऊतांची इच्छा
15-Apr-2026
Total Views |
मुंबई : (Navnath Ban) उद्धव ठाकरे यांच्यानंतर उबाठा गटाची धुरा आपल्याकडेच यावी यासाठी संजय राऊत प्रयत्नशील असून त्यासाठी एक गट हाताशी धरून ते प्रयत्न करत आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath Ban) यांनी बुधवारी दिली.
नवनाथ बन (Navnath Ban) म्हणाले की, "उबाठा गटात आता आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत ही थेट लढत पहायला मिळत आहे. आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष बनवण्याची तयारी उबाठा गटात सुरू असल्याबद्दल मला माहिती नाही, असे राऊत सांगतात. त्यांचा आदित्य ठाकरे यांना पूर्ण विरोध असून ते कार्याध्यक्ष होऊ नयेत यासाठी त्यांचा गट कार्यरत आहे. त्यातूनच 'आदित्य ठाकरे घरी बसतात, ते महाराष्ट्रात फिरत नाहीत' अशा वावड्या पसरवण्याचे कामही राऊत गटातल्या काही खासदारांकडून दिल्लीत बसून केले जाते. कारण संजय राऊत यांची स्वतः पक्षप्रमुख व्हायची इच्छा आहे. उद्धव ठाकरे यांच्यानंतर उबाठा गटाची धुरा स्वतःकडे ठेवण्यासाठी राऊत प्रयत्नशील असल्यानेच आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांना कुठलीही कल्पना न देता परस्पर कार्याध्यक्ष बनण्याची रणनीती आखली आहे."(Navnath Ban)
"आता आदित्य ठाकरेंचा गट विजयी होतो की, राऊतांचा ते पहावे लागेल. येत्या दीड वर्षात संजय राऊत यांच्या खासदारकीची मुदत संपते आणि त्यावेळी आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष असतील तर राऊत यांना पुढची खासदारकी आणि पुढचे मुख्य प्रवक्तेपदही मिळणार नाही. त्यामुळे संजय राऊत यांचा पत्ता कट होणार आहे असल्याने त्यांचा या सगळ्या प्रकरणाला विरोध आहे."(Navnath Ban)
तुमच्या पक्षाचे दोन तुकडे पडले
"मतदारसंघ वाढल्यामुळे देशात आग लागणार नाही तर, विरोधी पक्षांमध्ये आग लागलेली आहे. विरोधी पक्षाची अवस्था काय होणार हे येणाऱ्या २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत दिसेल. संजय राऊत तुम्हाला महाराष्ट्रात लोकसभेला आणि विधानसभेच्या निवडणुकीला उमेदवार मिळाले नव्हते. आता येत्या काळात ८०० खासदार होतील तेव्हाही उबाठा गटाला उमेदवार मिळणार नाहीत याची चिंता राऊतांना आहे. महाराष्ट्राची फाळणी होणार नसून तुमच्या पक्षाची फाळणई झाली आहे. त्याकडे लक्ष द्या. ४०० आमदार कुठे बसणार असा प्रश्न राऊत यांना पडतोय. लोकसभेत आता जवळपास साडेपाचशे खासदार आहेत मग महाराष्ट्राच्या विधानसभेत ४०० आमदार बसायला काय अडचण आहे? तुमच्या पक्षाचे दोन तुकडे पडले ते तुकडे तुम्हाला सांभाळता आले नाहीत. तुम्ही महाराष्ट्राच्या फाळणीबद्दल गप्पा करू नका. महाराष्ट्र हा एक संघ आहे आणि एक संघच राहील," असेही नवनाथ बन (Navnath Ban) म्हणाले.