मुंबई : (Sahar Shaikh) मुंब्रा येथील एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांच्या अडचणी वाढल्या असून त्यांचे नगरसेवक पद आता धोक्यात आलेय. तहसीलदार उमेश पाटील यांच्या चौकशी अहवालानुसार, सहर शेख (Sahar Shaikh) यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र अवैध असल्याचे आढळले आहे. अहवालात असेही उघड झाले की, सहर शेख मूळच्या उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील रहिवासी असून, त्यांनी कथितपणे चुकीची माहिती देऊन हे प्रमाणपत्र मिळवले होते.(Sahar Shaikh)
चौकशी अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की सहर शेख यांनी जात पडताळणी विभाग, निवडणूक विभाग तसेच उपविभागीय जिलाधिकारी कार्यालयाशी फसवणूक केली. यानंतर तहसीलदार उमेश पाटील यांनी सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची शिफारस केल्याचे दिसतेय. ही शिफारस उपविभागीय जिलाधिकारी, ठाणे तसेच कोकण विभाग जात पडताळणी समितीकडे पाठवण्यात आली आहे.(Sahar Shaikh)
हा संपूर्ण प्रकार सिद्दीकी अहमद नावाच्या व्यक्तीने केलेल्या तक्रारीनंतर समोर आला. त्यांच्या तक्रारीच्या आधारे करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीत सहर शेख (Sahar Shaikh) यांच्या वडिलांचे जात प्रमाणपत्र देखील अवैध असल्याचे निष्पन्न झाले, त्यानंतर पुढील कारवाईला सुरुवात झाली.(Sahar Shaikh)
एमआयएम पक्षाच्या मुंब्रा येथील नगरसेविका सहर शेख (Sahar Shaikh) यांच्या निवडणुकीनंतर त्यांचे दोन व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. एका व्हिडिओमध्ये त्या सभेत 'कैसे हरायाsss' असे म्हणताना दिसत होत्या, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये 'संपूर्ण मुंब्राला ह्या रंगात रंगवू' असे वक्तव्य करताना दिसल्या होत्या. या प्रकरणी त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल झाली होती. त्यानंतर सहर शेख यांनी माफी मागत स्पष्टीकरण दिले की ‘हिरव्या रंगा’चा अर्थ पक्षाच्या झेंड्याशी संबंधित होता. आता त्या बोगस जात प्रमाणपत्राच्या प्रकरणात पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.(Sahar Shaikh)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक