मुंबई : (Sant Tukdoji Maharaj) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार, कार्य आणि जीवनगाथा जगासमोर यावीत, ही राज्य शासन आणि सांस्कृतिक कार्य विभागाची भूमिका असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सांगितले.(Sant Tukdoji Maharaj)
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ निर्मित राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनावर आधारीत ‘खंजिरीचे बोल’ या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन, अभिनेता प्रसाद ओक आणि चित्रनगरीचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर उपस्थित होते.(Sant Tukdoji Maharaj)
महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपक्रमांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित ‘खंजिरीचे बोल’ या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे . त्यांच्या भक्ती, सेवा, परोपकार आणि ग्रामविकासाच्या विचारांचा संदेश अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचवण्याचा हा एक… pic.twitter.com/IYADy4iubB
तुकडोजी महाराजांनी भजन-कीर्तन, भक्ती आणि ग्रामसेवा यांच्या माध्यमातून समाजाला समाधानाचा मार्ग दाखवला. त्यांच्या ग्रामगीतेमधून ग्रामविकास, आध्यात्मिक उन्नती आणि श्रमाची प्रतिष्ठा यांचा संदेश दिला गेला आहे. आज जग विकासाचे खरे मॉडेल शोधत असताना राष्ट्रसंतांनी दिलेला ग्रामविकासाचा मार्ग अत्यंत पायाभूत आणि वास्तववादी असल्याचे शेलार यांनी यावेळी नमूद केले.(Sant Tukdoji Maharaj)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\