नवी दिल्ली : (S Jaishankar on Middle East Conflict Peace Diplomacy) संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याचे कामकाज सोमवार दि. ९ मार्चपासून सुरु झाले. मध्य पूर्वेत सुरु असलेल्या इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका युद्धातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पश्चिम आशियातील सद्यस्थितीबाबत सभागृहात भाष्य केले. जयशंकर यांनी अमेरिका-इस्रायलकडून इराणवर होत असलेल्या वाढत्या हल्ल्यांबाबत राज्यसभेत माहिती दिली आणि सर्व बाजूंनी तणाव कमी करण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच मार्ग असल्याची सरकारची भूमिका मांडली.(S Jaishankar on Middle East Conflict Peace Diplomacy)
संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच एकमेव मार्ग
"भारत शांततेच्या बाजूने आहे. सध्याच्या परिस्थितीत शांतता, संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच एकमेव मार्ग आहे; दोन्ही देशांतील तणाव कमी करणे, संयम राखणे आणि नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणे या गोष्टींचे भारत समर्थन करतो. भारत शेजारील प्रदेश आहे आणि पश्चिम आशिया स्थिर राहावा अशी आमची इच्छा आहे. आखाती देशांमध्ये एक कोटी भारतीय राहतात आणि काम करतात. इराणमध्येही काही हजार भारतीय शिक्षण किंवा नोकरीसाठी आहेत. हा प्रदेश आपल्या ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वाचा आहे. त्यात तेल आणि वायूचे अनेक महत्त्वाचे पुरवठादार आहेत. पुरवठा साखळीतील गंभीर व्यत्यय आणि अस्थिरतेचे वातावरण हे गंभीर मुद्दे आहेत", असे एस. जयशंकर यांनी राज्यसभेत सांगितले.(S Jaishankar on Middle East Conflict Peace Diplomacy)
ते पुढे म्हणाले, "कालपर्यंत आपल्या सुमारे ६७००० भारतीयांनी परतण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली आहे. पश्चिम आशियात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. सध्या नेतृत्व पातळीवर इराणशी संपर्क साधणे निश्चितच कठीण आहे, मी इराणी परराष्ट्र मंत्र्यांशी बोललो आहे. इराणमधील नेतृत्व पातळीवर तसेच या प्रदेशात पायाभूत सुविधांच्या नुकसानीसह मोठी जीवितहानी झाली आहे. सुरुवातीलाच, सरकारने २८ फेब्रुवारी रोजी एक निवेदन जारी करून आपली तीव्र चिंता व्यक्त केली होती आणि संयम बाळगण्याचे, तणाव वाढू नये आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले होते."(S Jaishankar on Middle East Conflict Peace Diplomacy)
तसेच, सरकारने इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना (अॅडव्हायझरी) जारी केल्या आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तेहरानवरील अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांवर लक्ष ठेवून आहेत. दूतावासाने यापूर्वीच अनेक विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास मदत केली आहे, तर कतार आणि जॉर्डनसारख्या देशांत अडकलेल्या भारतीयांना मदत करण्यासाठी आणि त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.(S Jaishankar on Middle East Conflict Peace Diplomacy)
परराष्ट्रमंत्र्यांनी सभागृहाला सांगितले की, "मी २८ फेब्रुवारी आणि ५ मार्च रोजी इराणी परराष्ट्रमंत्र्यांशी बोललो. इराणी परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की त्यांची तीन जहाजे हिंद महासागरात आहेत. इराणच्या विनंतीवरून आम्ही एका जहाजाला आश्रय दिला. इराणने याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे."(S Jaishankar on Middle East Conflict Peace Diplomacy)
विरोधी पक्षाच्या खासदारांची घोषणाबाजी
लोकसभा अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी विरोधकांना शांतता राखण्याचे आणि गोंधळ घालण्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराण युद्धाबाबत सभागृहाला माहिती देण्यास सुरुवात केली. दरम्यान, विरोधकांनी गोंधळ सुरूच ठेवला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी "आम्हाला चर्चा हवी आहे" अशा घोषणा दिल्या.(S Jaishankar on Middle East Conflict Peace Diplomacy)