उद्धव ठाकरे विधानपरिषदेत आले तर संजय राऊत यांची अडचण...
भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांची बोचरी टीका
09-Mar-2026
Total Views |
मुंबई : (Navnath Ban) "उद्धव ठाकरे विधान परिषदेत आले तर राऊतांची अडचण होईल म्हणून उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळावी यासाठी राऊत चकार शब्द बोलत नाहीत. उद्धव ठाकरे विधानपरिषदेत येऊ नये अशीच संजय राऊतांची इच्छा असल्याची बोचरी टीका भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोमवार दि.९ रोजी केली. उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेसाठी सोनिया गांधी, राहुल गांधींसमोर गुडघे टेकण्याशिवाय पर्याय नाही अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली. (Navnath Ban)
"कोवीड काळामध्ये तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्ह करून फुटकळ सल्ले देत होते. अडीच वर्षात अडीच दिवस देखील मंत्रालयात आले नाहीत. उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात विकास प्रकल्पांत खोडा घालून महाराष्ट्राचा विकास थांबवला. महाराष्ट्राला दहा वर्षे मागे नेऊन राज्याचे वाटोळे करण्याचे पाप उद्धव ठाकरे यांनी केले. या पापामुळेच मतदारांनी त्यांना विधानसभेच्या पाठोपाठ जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समितीच्या निवडणुकीला देखील त्यांना घरी बसवले." असेही बन यांनी स्पष्ट केले. (Navnath Ban)
यावेळी बन म्हणाले की," राज्यसभेसाठी सुरुवाती पासून संजय राऊत हे प्रियांका चतुर्वेदी ऐवजी शरद पवारांचे नाव पुढे करत होते. प्रवक्ते उबाठा गटाचे मात्र चाकरी शरद पवारांची अशी स्थिती राऊतांची झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची जागतिक स्तरावर उत्तम कामगिरी होत असून भारताची मान अभिमानाने उंचावत आहे. भारत कुणाचाही गुलाम नाही. संजय राऊत मात्र सिल्व्हर ओक वरील गुलाम आहेत अशी गुलामगीरी करणा-या राऊतांनी पंतप्रधान मोदींवर टीका करू नये असेही त्यांनी खडसावले. (Navnath Ban)
"इंडी आघाडीच्या उडालेल्या ठिक-या गोळा करण्याचे काम सध्या सुरू आहे आणि म्हणूनच चर्चेत राहण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधामध्ये अविश्वास ठराव आणला जातोय. लोकसभेचे कामकाज चालवण्यासाठी ओम बिर्ला अतिशय सक्षम असून विरोधकांनी कितीही उड्या मारल्या तरी हा प्रस्ताव फेटाळला जाईल. महाराष्ट्रात जशी मविआ ची शकले उडाली तशीच शकले देशात इंडी आघाडीची उडाली आहेत."असेही त्यांनी नमूद केले. (Navnath Ban)