मुंबई : (Vande Mataram Controversy) नागालँड पीपल्स फ्रंट (एनपीएफ) ने शैक्षणिक संस्थांमध्ये आणि विधानसभेत ‘वंदे मातरम्’चे अनिवार्य गायन करण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. पक्षाने हा निर्णय 'ख्रिस्ती बहुल' नागालँडसाठी ‘परका आणि असह्य’ असल्याचे म्हटले आहे. मार्च २०२६ च्या सुरुवातीला आलेल्या वृत्तांनुसार, एनपीएफने हा निर्णय “जबरदस्ती लादलेला” असल्याचे सांगत तो राज्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीला धोका असल्याचा दावा केला आहे. (Vande Mataram Controversy)
सत्ताधारी नागा पीपल्स फ्रंटने नुकताच देशभक्तीपर गीत ‘वंदे मातरम्’ याला कडाडून विरोध केला. शैक्षणिक संस्था आणि राज्य विधानसभेत हे गीत अनिवार्यपणे गाणे म्हणजे जबरदस्ती लादणे असल्याचे पक्षाने म्हटले आहे. तसेच या गीतामुळे नागालँडच्या धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीला धोका निर्माण होऊ शकतो, असा दावा पक्षाने केला आहे. (Vande Mataram Controversy)
मिळालेल्या वृत्तानुसार, एनपीएफने कोहिमा येथील केंद्रीय मुख्यालयातून प्रसिद्धीपत्रक जारी करून हा निर्णय राज्यातील लोकांसाठी “परका आणि असह्य” असल्याचे म्हटले आहे. कारण नागालँडमध्ये ख्रिस्ती लोकसंख्या अधिक आहे. पक्षाचे म्हणणे आहे की या निर्णयामुळे भारतीय संविधानाने दिलेले मूलभूत अधिकारही कमकुवत होऊ शकतात. (Vande Mataram Controversy)
नागालँडमध्ये भाजपची सहयोगी असलेल्या एनपीएफने हा निर्णय संविधानाच्या कलम ३७१-अ अंतर्गत राज्याला मिळालेल्या विशेष घटनात्मक संरक्षणाच्या विरोधात असल्याचे सांगितले. या कलमाचा उद्देश नागा लोकांच्या धार्मिक आणि पारंपरिक प्रथा-परंपरांचे संरक्षण करणे हा आहे. पक्षाने असेही म्हटले की राज्यातील बहुसंख्य लोकसंख्या ख्रिस्ती असल्यामुळे ‘वंदे मातरम्’चे गायन त्यांच्या अंत:करण आणि श्रद्धेच्या विरोधात जाऊ शकते. पक्षाच्या मते या गीतात हिंदू देवी-देवतांचा उल्लेख आहे. नागरिकांना त्यांच्या धार्मिक श्रद्धांच्या विरोधातील कृती करण्यास भाग पाडणे हे भारताच्या धर्मनिरपेक्ष व्यवस्थेच्या भावनेच्या विरोधात आहे. (Vande Mataram Controversy)
जानेवारीमध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाने ‘वंदे मातरम्’ गायनासाठी प्रोटोकॉल अधिसूचित करत एक निर्देश जारी केला होता. त्यानुसार या गीताची ३ मिनिटे १० सेकंदांची संपूर्ण आवृत्ती राष्ट्रगीत ‘जन गण मन’पूर्वी वाजवावी असे सांगण्यात आले आहे. हे गीत वाजवले जात असताना उपस्थितांनी सावधान स्थितीत उभे राहावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत. राष्ट्रपतींचे आगमन, तिरंगा ध्वजारोहण आणि राज्यपालांचे भाषण अशा सरकारी कार्यक्रमांत हे गीत वाजवण्याचीही सूचना करण्यात आली आहे. (Vande Mataram Controversy)
दरम्यान, नागालँड विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या गीतावरून वाद निर्माण झाला. राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्या भाषणादरम्यान हे गीत वाजवण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमदारांनी सभागृहात या निर्णयाचा विरोध केला. परिणामी मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांनी या विषयाचा सखोल विचार करण्यापूर्वी तपास आणि कायदेशीर सल्ल्यासाठी तो विधानसभेच्या निवड समितीकडे (सेलेक्ट कमिटी) पाठवण्याचा प्रस्ताव मांडला. (Vande Mataram Controversy)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक