राज्यसभा निवडणूक बिनविरोधच; दोन अर्ज ठरले बाद

    09-Mar-2026   
Total Views |

मुंबई:
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी येत्या १६ मार्च रोजी होणारी निवडणूक बिनविरोध पार पडणार आहे. सात जागांसाठी दाखल झालेल्या नऊ अर्जांपैकी दोन अपक्ष उमेदवारांचे अर्ज तांत्रिक कारणामुळे बाद ठरले आहेत.

सध्या राज्यसभेच्या सात जागांसाठी सातच उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, माया इवनाते, रामराव वडकुते ज्येष्ठ नेते शरद पवार, पार्थ पवार आणि ज्योती वाघमारे यांचा समावेश आहे.

या निवडणुकीत उमेश म्हात्रे आणि कांते सायन्ना या दोन अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, त्यांच्या अर्जावर सूचक आणि अनुमोदकांच्या सह्या नसल्याने छाननीमध्ये हे दोन्ही अर्ज बाद ठरवण्यात आले असून ही निवडणूक बिनविरोध झाली.


अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....