Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा मुंबईत दाखल! लोकभवनात शपथविधी होणार

    09-Mar-2026   
Total Views |

Jishnu Dev Varma

मुंबई : (Maharashtra Governor Jishnu Dev Varma) महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे सोमवारी ९ मार्च रोजी पत्नी सुधा देव वर्मा यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आगमन झाले. आहे. (Maharashtra Governor Jishnu Dev Varma)

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार आणि रितू तावडे यांनी त्यांचं स्वागत केले. नवनियुक्त राज्यपालांचा मंगळवारी १० मार्च रोजी दुपारी ४:३० वाजता राजभवन मुंबई येथे शपथविधी सोहळा होणार आहे.(Maharashtra Governor Jishnu Dev Varma)

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांना राजभवनात आगमनावेळी पोलीस दलाकडून मानवंदना देण्यात आली. यावेळी पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती आणि राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे उपस्थित होते.(Maharashtra Governor Jishnu Dev Varma)
 
 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\