मुंबई : (IAS officer Devendra Singh) मंत्र्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेले आयएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंह यांचे निलंबन मागे घेण्यात आल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी ९ मार्च रोजी विधानसभेत दिली.(IAS officer Devendra Singh)
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत सांगितले की, "आयएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंग यांनी पुरावे सादर करत घडलेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांचे निलंबन तत्काळ मागे घेण्यात यावे आणि त्यांच्या पदावर त्यांना रुजू करण्यात यावे," असा प्रस्ताव मांडत आहे.(IAS officer Devendra Singh)
विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी ब्रीफिंगसाठी वारंवार बोलावूनही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव एम. देवेंद्र सिंग उपस्थित राहिले नाहीत. तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांनी या बाबीची गंभीर दखल घेत तत्काळ निलंबनाचे आदेश दिले होते. मात्र, देवेंद्र सिंह यांनी अनुपस्थिती बाबतचे पुरावे सादर केल्यानंतर त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले.(IAS officer Devendra Singh)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....