Fuel shortage rumours: तेल, गॅसबाबत केंद्र सरकार काळजी घेत आहे; अफवांवर विश्वास ठेवू नका; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

09 Mar 2026 14:48:18
Fuel shortage rumours
 
मुंबई: (Fuel shortage rumours) केंद्र सरकार तेल, गॅस या सगळ्या गोष्टींची काळजी घेत आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण तरीही कुठेही तुटवडा पडू नये यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना सुरु आहेत. कुणीही अफवा पसरवू नये आणि कुणीही अफवेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. (Fuel shortage rumours)
 
विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "अफवांवर विश्वास ठेवून आपण साठे करणे सुरु केल्यास परिस्थिती खराब होईल. त्यातून मागणी आणि पुरवठा ही साखळी तुटेल. त्यामुळे कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नका, माध्यमांनी पुरावा नसलेल्या गोष्टी दाखवून लोकांमध्ये भीती तयार करू नये. केंद्र सरकार याबाबत उचित काळजी घेत आहे." (Fuel shortage rumours)
 
भारत पुन्हा चॅम्पियन (Fuel shortage rumours)
 
"आयसीसी टी २० वर्ल्ड चॅम्पियनमध्ये पुन्हा एकदा भारतीय टीमने भारताचा तिरंगा झेंडा फडकवला असून भारत पुन्हा चॅम्पियन झाला आहे. काल अनेक रेकॉर्ड तोडत भारताने ज्याप्रकारे न्युझिलंडचा पराभव केला, टी २० सामन्यांच्या अंतिम फेरीत असा स्कोर करणे आणि समोरच्या संघाला गारद करणे हादेखील एक नवीन रेकॉर्डच आहे. विशेषत: संजू सॅमसन, अभिषेक शर्मा यांनी ज्याप्रकारे बॅटिंग केली, त्यामुळे भारताला एक मजबूत फाऊंडेशन मिळाले. जसप्रीत बुमराह यांनी संपूर्ण सिरिजमध्ये चांगली बॉलिंग केली. कालही त्यांनी विलक्षण पद्धतीने बॉलिंग करून न्युझिलंडच्या टीमला गारद केले. एकूणच संघाची कामगिरी उत्तम राहिली आहे. केवळ एक सामना आपण हरलो असून इतर कुठल्याच सामन्यात पराजित झालो नाही. आपल्या संघाने एक खात्रीशीर विजय मिळवल्याबद्दल सुर्यकुमार यादव आणि संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन करतो. या टीममध्ये आपल्या मुंबईच्या खेळांडूंनीसुद्धा उत्तम खेळ खेळला," असेही ते म्हणाले. (Fuel shortage rumours)
 
हेही वाचा: ऊर्जा सार्वभौमत्वाची गर्जना  
 
परिवाराची गुलामी करणाऱ्यांना देश चालवण्याबाबत माहिती नाही (Fuel shortage rumours)
 
काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वक्तव्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "ज्यांचे आयुष्य एका परिवाराची गुलामी करण्यात गेले, त्यांना देश कसा चालवला जातो, देश कसा सार्वभौम ठेवायचा? याबाबत काहीही माहिती नाही. आज मोदीजी यांनी ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित केली आहे. अन्यथा, भारताची काय परिस्थिती असती हे आपल्याला माहिती आहे. ज्यावेळी टॅरिफ वॉर झाला तेव्हाही भारत झुकला नाही तर, त्याचा सामना केला. भारताने अनेक देशांसोबत टॅरिफ अ‍ॅग्रीमेंट केले, त्यामुळे ज्यांनी टॅरिफ वॉर केला, त्यांनादेखील मागे हटावे लागले. त्यामुळे एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी असे भाष्य करणे हास्यास्पद आहे." (Fuel shortage rumours)
 
विरोधकांना तोंड दाखवायला जागा नाही (Fuel shortage rumours)
 
"आता विरोधकांना तोंड दाखवायला जागा उरलेली नाही. गिरे तो भी टांग उपर असे विरोधकांचे सुरु आहे. जनता विरोधकांसोबत नाही. महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणूकांमध्ये जनतेने विरोधकांना जमीन दाखवली आहे. आम्ही निवडणूका जिंकण्याकरिता नाही तर, निवडणूका जिंकल्यानंतर कर्जमाफी केली आहे. त्यामुळे जनतेचा आमच्यावर विश्वास आहे. विरोधकांनी कितीही आंदोलन केले तरी, जनता त्यांच्यासोबत नाही," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Fuel shortage rumours)
 
 
Powered By Sangraha 9.0