मुंबई : (Deepak Azad Singh) भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईच्या अध्यक्षपदी दीपक आजाद सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमीत साटम यांनी याबद्दलची घोषणा केली. (Deepak Azad Singh)
दीपक सिंह यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात धारावी विधानसभा क्षेत्रातील युवा मोर्चा वॉर्ड महामंत्री म्हणून केली. त्यानंतर विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी मुंबई युवा मोर्चा महामंत्रीपद यशस्वीरीत्या सांभाळले आणि आता मुंबई अध्यक्ष म्हणून नवी जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी सामाजिक उपक्रम, आरोग्य शिबिरे, युवा सक्षमीकरण, क्रीडा स्पर्धा, पक्षाच्या विचारधारेचा प्रचार आणि जमीनी पातळीवर कार्यकर्त्यांचे संघटन यामध्ये मोलाचे योगदान दिले. महाविकास आघाडीच्या भ्रष्ट कारभाराच्या काळात वरिष्ठ भाजपा नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी रस्त्यावर उतरून जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला. (Deepak Azad Singh)
हेही वाचा: फक्त नावच मोठे...
या नियुक्तीबद्दल दीपक सिंह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आ. अमीत साटम यांचे आभार मानले. "पक्षाने माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो मी पूर्ण निष्ठा आणि प्रामाणिकपणे पार पाडेन. संघटन अधिक मजबूत करणे, मुंबईतील प्रत्येक युवापर्यंत भाजपची विचारधारा आणि शासनाच्या लोकोपयोगी योजना पोहोचवणे, तसेच राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात युवाशक्तीला जोडणे, हेच माझे ध्येय आहे,” असेही ते म्हणाले. (Deepak Azad Singh)