Acid Rain In Iran : इराणचा श्वास थांबणार? इस्रायली हल्ल्यांनंतर तेहरान विषारी धुराने काळवंडलं! 'अ‍ॅसिड रेन'मुळे जनजीवन विस्कळीत

09 Mar 2026 15:25:16

Acid Rain In Iran


मुंबई : (Acid Rain In Iran)
इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका युद्धाच्या दहाव्या दिवशी संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. इस्रायलने इराणच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर केलेल्या भीषण हवाई हल्ल्यानंतर धुराचे प्रचंड लोट हवेत पसरल्याने सर्वत्र विषारी धुराची चादर दिसून येत आहे. तेहरानमध्ये काही ठिकाणी 'काळा विषारी पाऊस' पडल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे. फोर्ब्सने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रदूषणामुळे शहरात आरोग्य आणि पर्यावरण आणीबाणी निर्माण झाली आहे.(Acid Rain In Iran)

सर्वत्र विषारी धुराचे लोट

इस्रायलने शनिवारी रात्री तेहरान आणि अल्‌बोर्ड्समधील अनेक तेल साठ्यांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. इस्रायली हल्ल्यात इराणचे मोठे तेल साठे आणि रिफायनरी जळून खाक झाल्या. या आगीतून निर्माण झालेला प्रचंड काळा धूर, राख आणि घातक रसायने आकाशात ढगांमध्ये मिसळली गेली. रविवारी जेव्हा तेहरानमध्ये पाऊस झाला, तेव्हा हा पाऊस काळ्या रंगाचा आणि चिकट स्वरूपाचा होता. यात मोठ्या प्रमाणात हायड्रोकार्बन आणि विषारी कण असल्याचे म्हटले जात आहे.(Acid Rain In Iran)

नागरिकांना उद्भवल्या आरोग्य समस्या

या घटनेमुळे वातावरणात हायड्रोकार्बन आणि धूर अधिक असल्याने स्थानिक नागरिकांना विविध आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत आहे. इराणमधील पर्यावरणसंबधित संस्थांनी नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. या विषारी पावसामुळे तेहरानमधील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास, डोळ्यांची जळजळ आणि त्वचेचे विकार जडणार आहेत. प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच, नागरिकांना मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, या पावसामुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत आणि शेतीचेही मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तेहरानमधील हा काळा पाऊस म्हणजे जागतिक पर्यावरणासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.(Acid Rain In Iran)


Powered By Sangraha 9.0